एक्स्प्लोर

Corona : काळजी घ्या! कोरोना आणि एच3एन2 चा डबल अटॅक! आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona News Update : राज्यात कोरोना आणि एच3एन2 रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे सध्या ही चिंतेची बाब समोर आली आहे.

Corona News Update : राज्यात कोरोना वाढत असतानाचा एच3एन2 रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सध्या ही चिंतेची बाब समोर आली आहे. वाढती कोरोना रूग्णांची संख्या आणि एच3एन2 रुग्णांची पाहता केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सोबतच एच3एन2 च्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेचा विषय ठरत आहे. 8 मार्चपासून राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या, बूस्टर डोस आणि नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. 

राज्यात काल 226 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोव्हिड ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 900 पार झाली आहे. महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत आठवड्यात 355 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली.  परंतु 9 ते 15 मार्च दरम्यान 688 रूग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात तेथे 279 प्रकरणे आढळून आली आहेत. तेलंगणामध्ये कोरोनाचा संसर्ग दर 0.31 टक्के, तामिळनाडूमध्ये 1.99 टक्के, केरळमध्ये 2.64 आणि कर्नाटकमध्ये 2.77 टक्के नोंदवला गेला आहे. त्यामुळे या राज्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

 एच3एन2 च्या रूग्णांमध्ये वाढ 

कोरोनासोबतच राज्यात एच3एन2 च्या रूग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. एच3एन2 च्या 119 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रुग्णालयात 73 जणांवर उपचार सुरु आहेत. एच3एन2 ची रुग्णसंख्या राज्यात 324 वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत एच3एन2 मुळे तीन जणांचा मृत्यू झालाय. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून रूग्णांवर वेळेत उपाचर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. 

"ऋतू बदलण्याच्या ट्रान्झिशन पिरिअडमध्ये अनेक आजार डोकं वर काढत असतात. अशात कोरोना आणि एच3एन2 सारख्या संसर्गजन्य आजारांनी डोकं वर काढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. इन्फ्ल्यूएन्झाच्या आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आढावा घेतलाय. वेळीच उपचार सुरु करण्याबरोबर जनजागृती देखील करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत अशी माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय तर दुसरीकडे इन्फ्ल्यूएन्झा आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची देखील संख्या वाढत असल्यानं चिंतेचा विषय ठरत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget