एक्स्प्लोर

अकोल्यात सहकार विभागाकडून सावकारांविरोधात धडक कारवाई

अकोला : अकोल्यात सहकार विभागानं सावकारांच्या विरोधात धडक कारवाई केली आहे. सावकारांनी अवैधपणे बळकावलेली तब्बल 88 एकर शेती मूळ मालक शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहे. सहकार विभागाच्या या कारवाईमुळे 15 शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा मालकी हक्क मिळाला आहे. या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही सावकारांनी त्यांची शेती बळकावली होती. गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात सावकारांनी हडपलेली तब्बल 94 एकर शेती मूळ मालक शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. अनंत भाकरेंची व्यथा अनंत भाकरे हे अकोल्यातील मोरगाव भाकरे येथे राहणारे शेतकरी. अनंत यांचा 18 वर्षांचा संघर्ष आणि शेतीसोबतची ताटातूट अखेर काल संपली. सावकाराने पचवलेली आपली शेती परत मिळवण्यासाठी हा संघर्ष होता. अनंत यांच्याकडे पाच एकर शेती होती. 1999 मध्ये अनंत यांनी अकोल्याच्या रमेशचंद्र गोलेच्छा या सावकाराकडून 1 लाख 40 हजारांचं कर्ज घेतलं होतं. बदल्यात सावकारानं त्याच्याकडून जमिनीची मालकी स्वतःकडे घेण्याचे लिहून घेतली. व्याजासह पैसे परत केल्यावर शेती परत करण्याचा तोंडी व्यवहार झाला. नापिकी आणि दुष्काळासारख्या अडचणी असतानाही अनंत यांनी 2006 पर्यंत हे कर्ज फेडलं. मात्र, तोपर्यंत सावकाराची नियत फिरली आणि अनंतच्या हक्काची शेती सावकाराच्या घशात गेली. 2006 पासून न्यायालयीन संघर्ष सुरु झाला. शेवटी हे प्रकरण सुनावणीसाठी अकोल्याच्या जिल्हा उपनिबंधकांकडे आले. काल अखेर अनंत यांना न्याय मिळाला. त्यांची शेती त्यांना परत मिळाली. 2014 साली राज्यात लागू झालेल्या सावकारविरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कायदा लागू झाल्यानंतर आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात 94 एकर शेती सावकाराकडून मुक्त करीत शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक गोपाल मावळे यांच्या पुढाकाराने सावकारमुक्त शेतीचा हा अकोला पॅटर्न जिल्ह्यात चांगलाच परिणामकारक ठरला आहे. या मालकी आदेशानंतर आता प्रत्यक्ष कारवाईसाठी हे प्रकरण आता महसूल विभागाकडे जाईल. महसूल विभाग शेतीचा सात-बारा या शेतकऱ्यांच्या नावावर करून त्यांच्या मालकीवर अंतिम मोहोर उमटवतील. यानंतर या सर्व सावकारांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मात्र, सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी परिणामकारकपणे केली तर सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, हे अकोल्यातील या कारवाईनं दाखवून दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget