एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान
मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दोन गटात झालेल्या वादात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. सध्या औरंगाबादेत जमावबंदी असून तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन औरंगाबाद पोलिस आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
काल संध्याकाळी मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे.
दरम्यान, औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील हे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याशी बातचित :
या राड्यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलिस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. दोन गटानं केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले. प्रकरण काय आहे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या गाड्यांचाही जाळपोळ, दहा पोलिस जखमी यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले. अफवांवर विश्वास ठेवू नये, महापौरांचे आवाहन “पाणी भरण्यावरुन किरकोळ वाद झाला, त्यावरुन तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ वादातून हे झालं आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थिती नियंत्रणात आहे. खासदारही रात्रभर इकडे आहेत. कोणताही चुकिचा प्रकार घडू नये म्हणून सगळेजण प्रयत्न करत आहेत.” असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. स्थानिक आमदार अतुल सावे यांचं जनतेला शांततेचं आवाहन “घटनेची कारणं समोर आली नाहीत. चौकशीनंतर कळेल. पण औरंगाबादकरांना आहन करतो की शांतता पाळावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घातलं असून, रात्रीच मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.”, असे स्थानिक आमदार अतुल सावे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका : दीपक केसरकर हा वाद मोठा होण्यामागे अफवांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच, आपण घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार : गृहराज्यमंत्री रणजित पाटील औरंगाबादमधील घटनेनंतर गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सकाळी साडेअकराला तातडीने अकोल्यावरुन औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सरकार या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची माहिती डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर अफवा न पसरवता शांतता राखण्याचं आवाहन डॉ. रणजित पाटील यांनी औरंगाबादच्या जनतेला केलं आहे. दरम्यान, औरंगाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. पाहा आतापर्यंतचे (सकाळी 7 वा.) अपडेट :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement