Maharashtra Congress : राज्यातील 288 मतदारसंघातील काँग्रेसच्या स्वबळाच्या चाचपणी संदर्भात नाना पटोलेंच स्पष्टीकरण, म्हणाले....
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळाची चाचपणी करत असून राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागवले आहे. याबाबत आता या संदर्भात नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
Maharashtra Congress : पक्ष संघटनेत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असले पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे, त्या अनुषंगाने राज्यात 288 जागेवर आम्ही उमेदवारांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा मेरीटच्या आधारावर काँग्रेसला (Congress) सुटतील त्या त्या जागेवर आम्ही आमचा उमेदवार उभा करू. त्यामुळे पक्षाची तयारी करणं यात काही गैर नाही आणि त्यामुळे याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. असे असले तरी आम्ही सर्व एकसाथ एका विचाराने पुढे जात आहोत. आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीच्याच नावाने आम्ही लढणार आहोत. या चाचपणी संदर्भातील अर्थाचा अनर्थ कुणीही करू नये. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीवर स्पष्टोक्ती दिली आहे. आज नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एमसीए चे आगळ वेगळं महत्त्व
स्वतः एक खेळाडू वृत्तीचा माणूस असून मी अनेक खेळ खेळलो आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मला विविध खेळांची आवड राहिली आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एमसीए चे आगळ वेगळं महत्त्व आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील तळागाळातील खेळाडूंना आज मोठ्या स्तरावर संधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः एक ग्रामीण भागातून आलेले असल्याने मला त्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या तळागाळातून विविध खेळांच्या भारतीय संघात महाराष्ट्रातील खेळाडू जावे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आम्हाला संधी मिळाली नाही म्हणून आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. या संबंधित निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात घेऊ असे देखील नाना पटोले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्ट लोकांचा सरदार- नाना पटोले
रवींद्र वायकर हे ज्यावेळेस लोकसभेचे उमेदवार झाले त्याच वेळी त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. पंतप्रधान मोदी आणि ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कशा पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्याकडे गेल्यावर वॉशिंग मशीन मध्ये कसा माणूस स्वच्छ होतो, यापूर्वी आपण सर्वांनी बघितलेले आहे. त्यामुळे मला या विषयात फार बोलण्यात रस नाही. राज्यासह देशात एखादी घटना झाली तर ती आपण मान्य करू, मात्र या भ्रष्ट लोकांचा सरदार जर आज कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. हे आता देशाला कळून चुकलेले आहे. रवींद्र वायकर यांच्या संबंधित अधिक बोलण्यात आता काही अर्थ उरलेला नाही, असे देखील नाना पटोले म्हणाले.
सरकार आस्थेला आणि जन भावनेला किंमतच देत नाही
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दीक्षाभूमी येथे भेट देणार आहे या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, दीक्षाभूमीला घेऊन काँग्रेसची आधीपासून एक भूमिका राहिली आहे. तेथे नव्याने विकास कामे होत असतील आणि त्याच्याने समाजातील आज तिला धक्का लागत असेल तर, तर त्याला विरोध होणारच आहे. त्यामुळे जनभावना आणि आस्था लक्षात घेऊन सरकारने ते काम केलं पाहिजे. सध्याचे सरकार आस्थेला आणि जन भावनेला किंमतच देत नाही. त्यामुळे मन की बात करणारच हे सरकार आहे. मुळे ते मनात येईल तसेच करत असतात लोकांच्या जनभावनेला किंमतच देत नाही, हे आपण गेल्या दहा वर्षात अनुभवले आहे. त्यातूनच असा उद्रेक होत असल्याचे नाना पाटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या