एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra : नांदेडच्या देगलूरमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात, जाणून घ्या यात्रेतील महत्त्वाचे मुद्दे

Rahul Gandhi : नांदेडमधील देगलूर या ठिकाणी गुरुद्वाराचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आजचा दिवस सुरू झाला. 

नांदेड: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने आजपासून महाराष्ट्रातील प्रवास सुरू केला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी प्रवेश केला. आज सकाळी गुरुद्वाराचे दर्शन घेऊन राहुल गांधी यांनी आपल्या यात्रेला सुरुवात केली. जाणून घेऊया या यात्रेतील महत्त्वाचे मुद्दे, 

देगलूरच्या गुरुद्वाराचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात

राहुल गांधी यांनी आज सकाळी देगलूरच्या यादगारी बाबा गुरुद्वाराला भेट दिली आणि त्याचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी देशवासियांना गुरु पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. 

राष्ट्र सेवादलाचे  कृष्णकुमार पांडे यांचं हृदयविकाराने निधन 

भारत जोडो यात्रेची सुरवात झाल्यानंतर राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. कृष्णकुमार पांडे यांच्या निधनामुळं अवघ्या यात्रेवर दु:खाचं सावट दिसून आलं. भारत जोडो यात्रेच्या शिबिरात खासदार राहुल गांधी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कृष्णकुमार पांडे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसचे पाईक राहिले. त्यांनी महाराष्ट्र सेवादलाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. आज सकाळी भारत जोडो यात्रा सुरु होताच कृष्णकुमार पांडे हे तिरंगा हातात घेऊन जयराम रमेश आणि दिग्विजयसिंह यांच्यासोबत चालत होते. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या हातातला तिरंगा झेंडा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे दिला आणि ते मागून चालत असताना अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

भालचंद्र मुणगेकर आणि हुसेन दलवाई यांचा सहभाग 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जेष्ठ अर्थतज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकर तसेच माजी खासदार हुसेन दलवाई हे सहभागी झाले. त्यांनी भारत जोडो यात्रेमुळे भाजप हादरली असून येत्या 2024 च्या निवडणूकीत या यात्रेचा परिणाम दिसून येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पोशाखात मुलींची हजेरी

महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अनेक मुली तुळशीचं झाड त्याचबरोबर श्रीफळ घेऊन राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबले आहेत. त्याचबरोबर अनेक शाळकरी मुलीसुद्धा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करून महाराष्ट्राच्या विषयावर राहुल गांधी यांचं स्वागत करताना एक युवक दिसतोय.

नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेतेही पदयात्रेत सहभागी

राहुल गांधींची भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई दिसत आहे. त्यासोबतच आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान आदी नेते पायी चालत आहेत. 

भोपळा येथील कॉर्नर सभा आटोपून राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस पूर्ण

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या आजच्या दिवसाचा प्रवास संपला आहे. नांदेडमधील भोपळा येथील कॉर्नर सभा होणार होती, पण राष्ट्रीय सेवा दलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाल्याने कया ठिकाणी शोकसभा घेण्यात आली आणि प्रवास थांबवण्यात आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Nagpur : प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - फडणवीस
प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - देवेंद्र फडणवीस
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024Devendra Fadnavis Nagpur : प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur : प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - फडणवीस
प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - देवेंद्र फडणवीस
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
Embed widget