एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा, केंद्रात मंत्रीपद द्यायला तयार, युती टिकवण्यासाठी काँग्रेसची 'वंचित'ला नवीन ऑफर

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यामुळे त्यांना एका प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे.

Congress Offers To Prakash Ambedkar : जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीमधून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. असे असतांना काँग्रेस पक्षाकडून (Congress Party) अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असून, तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर देण्यात आली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भुमिकेवर बोलतांना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद (Anis Ahmed) यांनी म्हटले आहे की, "प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिस अहमद यांनी दिली आहे. 

आंबेडकरांमुळे बीजेपीला फायदा होईल... 

2019 मध्ये ही प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाही. मात्र, त्यांच्यामुळे बीजेपीला फायदा होईल असे आम्ही त्यांना कळविले आहे. प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून, ते राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचेही अनिस अहमद म्हणाले आहे. 

काँग्रेस पक्षाकडून आंबेडकरांची मनधरणी...

महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. अनेक बैठकींना आमंत्रण मिळत नव्हते आणि अपेक्षित जागा देखील दिल्या जात नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या एकला चलो रे भुमिकेचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत होणारे हे नुकसान पाहता काँग्रेस पक्षाकडून आंबेडकरांची मनधरणी केली जात असल्याचे बघायाला मिळत आहे. 

दोस्तीचा हात पुढं करायला तयार : नाना पटोले 

प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आग्रही आहेत. "आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करण्यासाठी तयार आहोत, तुम्हाला पाहिजे असलेल्या जागा पण द्यायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांना ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला सुद्धा तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून, मतांचं विभाजन नको यासाठी आंबेडकरांनी एकत्र यायला पाहिजे असेही" पटोले म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका; नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget