एक्स्प्लोर
काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं, अनेक आमदार भाजप-शिवसेनेच्या संपर्कात
भाजपकडून 220 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावा करत आहेत. मग त्यांना दुसऱ्या पक्षातील आमदार का फोडावे लागतात? असा सवाल याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.
मुंबई : काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं आहेत. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला गळती लागण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथे जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पहिला धक्का माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिला. माढा लोकसभेच्या जागेवर सुरू झालेल्या राजकारणानंतर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडली. त्यांच्यामागे काही आमदार देखील आता विधानसभा निवडणुकीत देखील पक्ष सोडण्याची शक्यता आहे.
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनागरच्या ज्योती कलानी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. संग्राम जगताप यांनी दक्षिण नगर मधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक लढली होती पण महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी भाजपला केलेली मदत त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जाते आहे.
कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे देखील सेनेच्या मार्गवर असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजपकडून 220 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावा करत आहेत. मग त्यांना दुसऱ्या पक्षातील आमदार का फोडावे लागतात? असा सवाल याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे जिथे कोणी पक्ष सोडून जात आहे तिथले भाजप सेनेतील स्थानिक नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या विरोधी पक्षातील आमदार आपल्या राजकीय भवितव्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरत आहेत. विरोधी पक्षात राहिलो तर आपण निवडून येणार नाही याची भीती काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीमधून यापूर्वी सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांच्या माध्यमातून हे आमदार भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. 2014 विधानसभा निवडणुकीत अनेकांनी भाजप प्रवेश केला होता. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील हाच ट्रेंड दिसण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement