एक्स्प्लोर
नागपुरात काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान

नागपूर: नागपुरात गांधी जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांची राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा प्रकार घडला आहे. संपूर्ण राष्ट्रगीत सुरु असताना बसलेल्या नेत्यांना अखेरच्या दोन ओळी राहिल्या असताना जाग आली आणि ते उभे राहिले. नागपुरातल्या चितार ओळीच्या गांधी पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विजय वडेट्टीवार, माजी आमदार गेव्ह आवारी, आमदार सुनील केदार, माजी मंत्री नितिन राऊत हे या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते. शाळकरी मुलांनी राष्ट्रगीत सुरू केलं तरी नेतेमंडळींच्या गप्पा मारण्यात दंग होती. शेवटी मध्येच नगरसेवक प्रफुल गुधडे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी सर्वांना उभं केलं.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















