एक्स्प्लोर

भारतरत्न शरद पवार! शॉटगन शत्रुघ्न सिन्हांच्या खास शुभेच्छा

Sharad Pawar Birthday  : अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही शरद पवार यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharad Pawar Birthday  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज म्हणजे 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही शरद पवार यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या भारतरत्नला शुभेच्छा, असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी पवारांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. काहींनी या ट्वीटचं समर्थन केलेय तर काही नेटकऱ्यांना यावर टीका केली आहे. 

ट्वीटमध्ये काय म्हटलं शत्रुघ्न सिन्हा यांनी?
खऱ्या अर्थानं आपल्या भारतरत्नला शुभेच्छा, महाराष्ट्राची शान, ग्रेट मराठा लीडर, राजकारणातील चाणक्य... शरद पवार यांना वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा! तुम्हाला दीर्घायुष्य लाभो! 

शरद पवार यांनी तब्बल 4 वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. केंद्रीय मंत्रिमंडळातील कारभारही त्यांनी चोख बजावला. पवारांनी त्यांच्या भाषणाने अनेक सभा आणि मेळावे गाजवले. याचे ताजे उदाहरण म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांचं पावसातील भाषण. हे भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांचे मोठं योगदान आहे. राज्यभरात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सोहळे झाले. 

शरद पवार झाले भावूक 
मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार... राजकारणातील चाणक्य असणाऱ्या पवारांचे डावपेच भल्याभल्यांना कळत नाहीत. त्यामुळेच पवार म्हटलं की काहीही होऊ शकतं अशी चर्चा कायम ऐकायला मिळते.. मात्र तेच पवार भावूक होणं, जुन्या आठवणीत रमणं हे दुर्मीळ... आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. निमित्त ठरलं त्यांच्या 81व्या वाढदिवसाचं.. राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं सरप्राईज दिल्याबद्दल पवारांनी साऱ्यांचे आभार मानले. यावेळी 12 डिसेंबर हा दिवस आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं दिवस असल्याचं सांगत पवारांनी खास नातं उलगडलं... राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आपल्या खास शैलीत पवारांना शुभेच्छा दिल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 09 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Embed widget