हिंसेची आग थांबवणाऱ्यांचेच घर पाडले, देशात हिंसाचार दहशत वाढली, नितीन राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
जे लोक हिंसेची आग थांबायला गेले होते त्यांचेच घर पाडले आहे. ज्यांचे घर पाडले त्यांचे घर सरकारला बांधून द्यावे लागले असे मत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

Nitin Raut : जे लोक हिंसेची आग थांबायला गेले होते त्यांचेच घर पाडले आहे. ज्यांचे घर पाडले त्यांचे घर सरकारला बांधून द्यावे लागले असे मत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केले. नागपूर शहरांची ताजबाग आणि दीक्षाभूमी अशी ओळख आहे. हे शांतता प्रिय शहर आहे. मात्र, काही लोकांना रमजान महिना आणि पुढे राम नवमी असताना इथं द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे राऊत म्हणाले. या लोकांना विसर पडला की ज्या रामाला हे लोक मानतात त्या रामाने शबरीकडून बोरं खाल्ली होती असेही राऊत म्हणाले. देशात ठिकठिकाणी हिंसाचार वाढत आहे. आमच्या नागपूर शहरात गोळ्या चालत आहेत. पुण्यात कोयता गँगची दहशत असल्याचे राऊत म्हणाले.
देश एकत्र रहावा, मैत्री आणि प्रेम रहावं अशी या लोकांची इच्छा नाही, अशी टीका देखील राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. ज्यावर कुराणची पवित्र आयत लिहिलं होतं ते जाळलं आहे. हे लोक सद्भावना यात्रेला विरोध करत आहेत. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत कोणाचाही घर पाडायचं नाही. तरी पोलिसांना घर पाडायचे आदेश दिले जातात. नागपूर पालिका आयुक्ताने हायकोर्टात माफी मागितली आहे. (फहीम खानच घर पाडलं) पण माफी मागून चालणार नाही ज्याचे घर पाडले त्याची भरपाई देण्याची भाषा करा असेही राऊत म्हणाले.
राहुल गांधींचं नाव आमच्या हृदयात, त्याला कोणीच मिटवू शकत नाही
जे लोक आणि नेते संविधानाची भाषा करतात त्यांना भीती दाखवली जात असल्याचे नितीन राऊत म्हणाले. पोलिसांनी जबाबदारी पाळली असती तर ही घटना घडली नसती असेही राऊत म्हणाले. राहुल गांधींच नाव समुद्राच्या लाटेतून मिटेल असं नाही तर त्याचं नाव आमच्या हृदयात आहे. ज्याला कोणीच मिटवू शकत नाही असेही नितीन राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराच्या दंगलग्रस्त भागात काँग्रेस आजपासून सद्भावना यात्रा काढणार आहे. समाजात जातीय धार्मिक विद्वेष वाढत असून त्याला उत्तर म्हणूनच ही सद्भावना यात्रा असणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आज (16 एप्रिल) निघणाऱ्या या यात्रेत पक्षाचे सर्व राज्यस्तरीय तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























