एक्स्प्लोर

मोठी बातमी : भाजप 2034 मध्ये देशात नवं संविधान आणणार, काँग्रेसचा खळबळजनक दावा, मंगेशकरांच्या माफीची मागणी!

देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु असून, 2034 साली नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरु असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Harshvardhan Sapkal :  देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु असून, 2034 साली नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरु असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांना व्यक्तिशः पक्ष संदर्भात आणि विचारधारेशी संबंधित भारताचं संविधान मान्य नसल्याचे सपकाळ म्हणाले. त्यामुळं संघ आणि भाजपच्या बगलबच्चांनी नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु केल्याचे सपकाळ म्हणाले. 

पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्राची माफी मागावी 

2034 झाली देशात नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठकाही सुरु झाल्या असल्याचा दावा आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चौफेर टीकाही केली आहे. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्राची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

11 वर्षात पंतप्रधान मोदींनी काहीच केलं नाही

गेल्या 11 वर्षात पंतप्रधान राहूनही मोदींनी सांगण्यासारखं काहीचं केलं नसल्याने काल त्यांनी आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केल्याचे सपकाळ म्हणाले. भ्रम पसरवणे, काँग्रेसला बदनाम करणं एवढेच मोदींनी सुरु केलं आहे. पंतप्रधानांचा असं वर्तन हे अशोभनीय असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थेट सन्मानाचे कायदामंत्रीपद दिलं होतं हे मोदींनी विसरु नये असंही सपकाळ म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान आहेत हे भाजप आणि संघाला मान्य नाही

नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेबांना दर्शन घेऊ दिलं नाही हे दुर्दैव आहे. दलित ओबीसी आणि काँग्रेसमध्ये मोदी दरी निर्माण करु बघत आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना मोदी फॅसिस्ट करत आहेत. आरएसएस जनसंघ व आजच्या भाजपच्या लोकांनी बाबासाहेबांना नेहमीच असन्मानित केलं आहे. मनुस्मृतिद्वारे संविधान लिहिलं जावं व मनुस्मृतिद्वारे संविधान चालावं असं गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं "बंच ऑफ थॉट" हे भाजपच " बायबल " आहे असा टोलाही सपकाळ यांनी भाजपला लगावला. भाजपला आणि संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान आहेत हे मान्यच नाही. भाजपाला जर इतकं वाटत असेल तर त्यांनी गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं बंच ऑफ थॉटची होळी करावी असेही सपकाळ म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कधीही काँग्रेसमुळं माझा पराभव झाला असं म्हटलं नाही. उलट त्यांनी त्यांच्या पराभवाच्या कारण डांगे व विनायक दामोदर सावरकर यांच्यावर फोडल्याचे सपकाळ म्हणाले. 

भाजपला जर संविधान बदलवायचं आहे तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी

मोदींना व्यक्तिशः, पक्ष संदर्भात आणि विचारधाराशी संबंधी भारताच संविधान मान्य नाही. संविधान लिहिताना ते मनुस्मृती संबंधित लिहिल्या गेलं पाहिजे असं संघाने आणि जनसंघाने सांगितलं होतं याचे पुरावे उपलब्ध आहेत. ते समतेच्या विरोधात होते. सध्या देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया संघ आणि भाजपच्या बगलबच्चांनी सुरु केली आहे. 2034 साली आम्ही नवीन संविधान लागू करू यासाठी त्यांच्या बैठकाही सुरू आहेत. असे सपकाळ म्हणाले. 2024 च्या निवडणुकीत आपकी बार 400 पार हे जे सुरु होतं तर भाजपचेच उमेदवार सांगत होते की आम्हाला संविधान बदलायचा आहे आणि अजूनही ते त्यावर ठाम आहेत. भाजपला जर संविधान बदलवायचं आहे तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी "मुह मे राम बगल मे छुरी.." असं करु नये असेही सपकाळ म्हणाले. 

 फडणवीस सरकार हे औरंगजेबच्या क्रूरते प्रमाणेच काम करतंय

औरंगजेब ज्याप्रमाणे धर्माचा वापर सरकार चालवण्यासाठी करत होता त्याचप्रमाणे आजच फडणवीस सरकार हे औरंगजेबच्या क्रूरते प्रमाणेच काम करत आहे. संविधानापेक्षा इंग्रज परवडले, आम्हाला स्वातंत्र्य नको अशी भूमिका घेणारे महाराष्ट्रात त्याकाळी काही लोक होते ( सावरकर यांचं नाव न घेता यांच्याकडे दिशानिर्देश ) यांचं व्यक्तींनी इंग्रजांना मदत केली. त्यांचं पेन्शन घेतलं माफीनामाही लिहून दिला. अशा प्रवृत्तींचे पुतळे हे काढून टाकणार का? असा सवाल ज्यावेळेस मी केला त्यावेळेस त्यांनी औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावर माघार घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व नाकारणारे व इतिहास समोर येऊ नये यासाठी "फुले" चित्रपट रिलीज कसा होऊ देणार..? असा सवालही सपकाळ यांनी केला. जर अमित शाह औरंगजेबच्या कबरीला समाधी म्हणत असतील तर गोळवलकर गुरुजींच्या व हेडगेवार गुरुजींच्या स्मृतीस्थळाला कबर म्हणायचं का..? हा माझा अमित शाहा यांना प्रश्न असल्याचे सपकाळ म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Harshvardhan Sapkal Majha Maharashtra Majha Vision: औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Nagpur: नागपूरमध्ये 20 कोटींचा अक्षरशः चुराडा! 23 वर्षानंतरही क्रीडा संकुल अर्धवटच; फुटबॉल स्टेडियम ते टेनिस कोर्टमध्ये कचरा अन् भंगारचे ढीग, खेळाडूंचं स्वप्नं धुळीला मिळालं
नागपूरमध्ये 20 कोटींचा अक्षरशः चुराडा! 23 वर्षानंतरही क्रीडा संकुल अर्धवटच; फुटबॉल स्टेडियम ते टेनिस कोर्टमध्ये कचरा अन् भंगारचे ढीग, खेळाडूंचं स्वप्नं धुळीला मिळालं
Maharashtra Rain Updates: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Dadar Best Bus Accident : डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America missile attack on Iran:America missile attack on hormuz region destroyed Iran Air defence Drone and Radar system after iran army irgc shot down american army apache helicopter
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
Embed widget