एक्स्प्लोर

दाभोलकरांच्या हत्येचा आरोप असणाऱ्या संस्थेवर बंदी घाला : हुसेन दलवाई

डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या हत्येचे आरोप असणाऱ्या संस्थांवर ताबतोब बंदी घालावी आणि संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असी मागणी हुसेन दलवाई यांनी सरकारकडे केली आहे.

नवी दिल्ली : ज्या सनातन संस्थांवर डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या हत्येचे आरोप आहेत त्या संस्थांवर सरकारनं ताबडतोब बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. तसेच संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही दलवाई यांनी सरकारकडे केली आहे. दलवाई यांनी बोलताना सांगितले की, 'आरे आणि नाणार या दोन्ही प्रश्नांबाबतच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, याचा मला खरचं फार आनंद आहे. नाणार आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो, तसेच मी तिथे सत्याग्रही केला होता. आमच्या पक्षानेही या आंदोलनात अनेक भूमिका घेतल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही निर्णयांचं मी स्वागत करतो. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणासंबंधी ताबडतोब चौकशी करावी. संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या बाबतीत सरकारने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे. भीमा-कोरेगाव मध्ये या दोन्ही व्यक्तींचा थेट सहभाग होता. परंतु ते विशिष्ट विचारांचे असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने यासंदर्भात कडक भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे.' पाहा व्हिडीओ :  'सांगलीमध्ये दंगल झाली त्यावेळी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची बाजू घेऊ नका असं मी जयंत पाटलांना सांगणार आहे. भिडे आणि एकबोटे या दोन व्यक्ती महाराष्ट्रात अत्यंत वाईट काम करतात. त्यामुळे त्यांना अद्दल घडवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सनातन संस्थेवर बंदी घालणं गरजेचं आहे. कारण ही संघटना दहशतवाद पसरवणारी संघटना आहे. फक्त संस्थाच नाहीतर संस्थेच्या प्रमुखांवरही कारवाई केली गेली पाहिजे.' असंही त्यांनी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'एवढचं नाहीतर मालेगावच्या खटल्यात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर आरोपी असूनही भाजपने त्यांना खासदार केलं. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. दहशतवाद पसरवणारी कोणत्याही समाजाची व्यक्ती असली तर त्याचं समर्थन करणं अत्यंत चुकीचं.' आजपर्यंत शिवसेनेने सनातन संस्थेला कधीही पाठिंबा दिलेला नाही. तसेच महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्र शांत ठेवणं आवश्यक आहे. काँग्रेस सरकारच्या काळात अंमलबजावणी झाली नाही ती आमची चूक होती. पण आता सध्या महाराष्ट्रात पुरोगामी सरकार आलेलं आहे. महाराष्ट्राची प्रगती करणार सरकार आलेलं आहे. महाराष्ट्रात शांतता ठेवावी आणि विकास करावा ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. दाभोलकर, पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जातात, त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधून काढलं पाहिजे. सनातन संस्थेचे जे लोक बोलतात त्यावरुन हे स्पष्ट होत आहे, सरकार नक्की या संबंधात विचार करतील असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे. संबंधित बातम्या :  महाराष्ट्र कर्जाच्या खाईत, राज्यावर पावणेसात लाख कोटींचं कर्ज; प्रत्येकाच्या डोक्यावर 54 हजारांचा भार मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या; खासदार संभाजीराजेंची मागणी INX Media प्रकरणी पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर, 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येणार राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget