एक्स्प्लोर

INX Media प्रकरणी पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर, 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येणार

चौकशीत सहकार्य आणि देश सोडून न जाण्याची अटीवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तब्बल 106 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.

नवी दिल्ली : INX Media घोटाळाप्रकरणी गेल्या 106 दिवसांपासून दिल्लीतील तिहार जेलमध्ये असेलले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन लाखांच्या जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. यावेळी चिदंबरम यांना ईडीला चौकशीत संपूर्ण सहकार्य करण्याचं आणि देशाबाहेर न जाण्याची अट सुप्रीम कोर्टानं घातली आहे. मागील 106 दिवसांपासून पी. चिदंबरम हे तिहार तुरुंगात होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात पी. चिदंबरम यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण याआधीचं सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. ‘या’ अटींवर पी. चिदंबरम जामीन मंजूर • कोणत्याही परवानगीशिवाय देशाबाहेर न जाण्याची अट • दोन लाखांचा जातमुचलका • साक्षीदारांशी संपर्क साधणार नाही • आयएनएक्स घोटाळाप्रकऱणी माध्यमांना कुठलीही मुलाखत वा बाजू मांडण्यास सक्त मनाई आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना 106 दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. VIDEO | चिदंबरम यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंह तिहार जेलमध्ये | एबीपी माझा काय आहे प्रकरण? UPA-1 सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या काळात एफआयपीबीने दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांच्या कार्यकाळात 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचं परदेशी चलन मिळवण्यासाठी आयएनएक्स मीडिया समूहला दिलेल्या एफआयपीबी मंजुरीत अनियमितता झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने 15 मे 2017 रोजी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली होती. तर ईडीने मागील वर्षी या संबंधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. ज्या दोन कंपन्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केली होती, त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या आहेत. त्यामुळे कार्ती यांच्या हस्तक्षेपानंतर आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी देण्यात आली असावी, असा दावा ईडीने केला आहे. तसंच एफआयपीबीच्या मंजुरीसाठी आयएनएक्स मीडियाचे पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती, जेणेकरुन वाटपात कोणताही विलंब होऊ नये, असं ईडीच्या तपासात आतापर्यंत समोर आलं आहे. या प्रकरणात सीबीआयने त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 28 फेब्रुवारी 2018 रोजी अटक केली होती, जे सध्या जामीनावर बाहेर आहेत. 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी मिळवून देण्यासाठी कथितरित्या लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संबंधित बातम्या चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गेटवरुन उड्या मारुन सीबीआय पथक घरात 27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget