एक्स्प्लोर
मुलाला मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं सोनिया गांधींना पत्र
महाविकास आघाडीचं सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार पार पडून महिना उलटून गेला असेल मात्र, अजूनही पक्षातील धुसफूस थांबलेली दिसत नाही. मुलाला मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंतराव थोपटे यांनी थेट सोनिया गांधी यांनाचं पत्र लिहलंय.
नवी दिल्ली : मंत्रिमंडळात संग्राम थोपटेंचं शेवटच्या क्षणी नाव वगळलं गेल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलंय. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असूनही थोपटे कुटुंबाला न्याय मिळत नसल्याची खंत या पत्रात व्यक्त करण्यात आलीय. थोपटे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असूनही, संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहूनही न्याय मिळत नसल्याचं गा-हाणं त्यांनी हायकमांडकडे मांडलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली खंत व्यक्त केली आहे. अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही, संग्राम थोपटे यांचं नाव शेवटच्या क्षणी वगळलं गेल्याची खंत या पत्रातून व्यक्त झाली आहे. थोपटे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असूनही, संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहूनही न्याय मिळत नसल्याचं गाऱ्हाणं त्यांनी हायकमांडकडे मांडलं आहे.
पक्षाशी एकनिष्ठ राहुनही दुर्लक्ष -
पुणे हा चार खासदार, 21 आमदार असलेला जिल्हा. मात्र, तिथे पक्षाने ताकद दिली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे हे यावेळी तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गेल्या अकरा निवडणुकांमध्ये थोपटे कुटुंबांने काँग्रेस पक्षाचा झेंडा या मतदारसंघात फडकवला आहे. आम्ही गेल्या पन्नास वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मात्र, तरीही पक्षानं आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांनी या पत्रात म्हटले आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना काँग्रेसकडून अजिबात प्रतिनिधित्व नसल्याने त्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे : एकनाथ खडसे
या पत्रात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसची पडझड थांबवण्यासाठी सोनिया गांधी यांची 1999 मध्ये भोरमधील सभा आयोजित केल्याची आठवणही त्यांनी नमूद केली आहे. शंकरराव चव्हाण, माधवराव शिंदे, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव, प्रतापराव भोसले यांच्या सांगण्यानुसार ही सभा आयोजित केली. त्यानंतर सरकार आलं पण मला मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये विलन बनवलं गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी हे पत्र काँग्रेस अध्यक्षांना लिहिले आहे, त्यामुळे आता या पत्राची काही दखल दिल्लीतून घेतली जाते का? हेदेखील पाहावे लागेल.
Sangram Thopte | काँग्रेस भवनातील तोडफोडीची संग्राम थोपटेंकडून पाहणी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
Advertisement