एक्स्प्लोर

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृह जिल्ह्यात काँग्रेसची वेगळी चूल? भंडारा-गोंदियातील 7 मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा

सध्या मविआमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या दररोज चर्चा रंगलेल्या असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यात मात्र काँग्रेसनं वेगळी चूल मांडल्याचं चित्र बघायला मिळतंय.

भंडारा : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी  (Mahavikas Aghadi) आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) जागा वाटपाच्या दररोज चर्चा रंगलेल्या असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या भंडाऱ्यात मात्र काँग्रेसनं वेगळी चूल मांडल्याचं चित्र बघायला मिळालंय. नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यातील साकोली इथं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तीन आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यावेळी एका उमेदवाराला दहा मिनिटं देण्यात आलीत.

दरम्यान, अनेकांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत पक्षाकडं दावेदारी केली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार या मुलाखती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर साकोलीतून दावेदारी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र या मुखतीला दिसले नाहीत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सातही विधानसभेवर यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दावा  सांगितलेले आहे. आज मुलाखती झाल्यानं काँग्रेस या सातही जागा सोडणार नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. एकंदरीतचं काँग्रेसनं घेतलेल्या निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखत घेतल्यानं, काँग्रेस राज्यात स्वतंत्र लढण्याची तयारी किंवा वेगळी चूल तर मांडत नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भंडारा-गोंदियातील 7 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा

दरम्यान, जागावाटपापूर्वी नाना पटोले यांनी दावा करत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कोंडीत पकडले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भंडारा तर, राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चार विधानसभेवर दावा केला आहे. नाना पटोले दोन्ही जिल्ह्यातील एकही जागा सोडायला तयार नसल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दिसणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

आगामी काळात महाविकास आघाडीचं काम करून उमेदवारांना विजयी करण्याचा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या भंडाऱ्याच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. गृह जिल्हा असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर दावा सांगून या जागा खेचून आणण्यासाठी पटोले यांनी शड्डू ठेकला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकतेNagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढलीABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget