एक्स्प्लोर
दुचाकीसोबत हेल्मेट देणं बंधनकारक, कायद्याच्या अंमलबजावणीचे औरंगाबाद माहिती आयुक्तांचे निर्देश
दुचाकी विकत घेताना ग्राहकाला सोबत दोन हेल्मेट देण्याच्या कायद्याची अमंलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश औरंगाबादचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी दिले आहेत.
नागपूर : दुचाकी विकत घेताना ग्राहकाला सोबत दोन हेल्मेट देण्याच्या कायद्याची अमंलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश औरंगाबादचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी दिले आहेत. नागपूरच्या एका माहिती अधिकार याचिकेवर निर्णय देताना त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
दुचाकी विकत घेताना दोन हेल्मेट ग्राहकाला देण्यात यावे अशी मोटार वाहन कायद्यात तरतुद आहे. ग्राहकांकडून मात्र वर्षानुवर्षे हा अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. मोटर वाहन कायद्यात हे नमूद केले असताना हि कायद्याची अंमलबजावणी होताना कधी भारतात दिसली नाही.
नागपुरचे माहिती अधिकार कार्यकर्ते तोरम हरीश नायडूंनी यासंदर्भात याचिका केली होती. यावर निर्णय देताना औरंगाबादचे माहिती आयुक्त धारूरकर यांनी राज्याचे प्रधान सचिव परिवहन व बंदरे, गृह विभाग, मंत्रालय यांना कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement