एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना यापुढे 10 लाख रुपये
![एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना यापुढे 10 लाख रुपये Compensation Worth Rs 10 Lacks To Be Given To Family Of St Accident Victims एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना यापुढे 10 लाख रुपये](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/07203225/Diwakar-Rawte-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस.टी. बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचारी आणि प्रवाशांच्या कुटुंबियांना यापुढे 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात माहिती दिली.
महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी चिपळूण मधील एस. टी. आगारात रावते आले होते. यापुढे एसटी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना डेपोमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येईल, प्रवाशांच्या कुटुंबियांना यापुढे 10 लाख रुपये नुकसानभरपाई किंवा नोकरी देण्यात येईल, असं रावते यांनी स्पष्ट केलं.
महाडमधील सावित्री नदीवरील दुर्घटनेत आज शोधकार्यादरम्यान दोन मृतदेह आढळले आहेत. केंबुर्लीजवळ हॉटेल नीलकमलच्या पाठीमागे एक, तर ओव्हळे गावाजवळ आज दुसरा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतदेहांचा आकाडा आता 27 वर पोहचला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बातम्या
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)