एक्स्प्लोर
'राष्ट्रकुल'मधील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे डीवायएसपी
'राष्ट्रकुल स्पर्धे'मध्ये सुवर्णपदक पटकावणारा बीडचा कुस्तीपटू राहुल आवारेला डीवायएसपीची नोकरी देण्यात आली आहे.

बीड : 'राष्ट्रकुल स्पर्धे'मध्ये सुवर्णपदक पटकावणारा बीडचा कुस्तीपटू राहुल आवारेला गृह खात्याने सरकारी नोकरीत सामावून घेतलं आहे. गृह विभागाने नियुक्तीचे आदेश काढत राहुलला डीवायएसपीची नोकरी दिली आहे. गृह खात्याने राहुलच्या नियुक्तीचे आदेश आज पारित केले. खेळाडूंना शासकीय नोकरीत घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राहुल आवारे बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा रहिवासी आहे. राज्याचं नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय आज घेण्यात झाला. त्यात राहुलला पोलिस उप अधीक्षक या पदावर गृह विभागाने थेट नियुक्ती दिली. राहुलसोबतच इतर 32 खेळाडूंनाही शासनाच्या विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. राहुल आवारेने ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या खेळाडूला चीतपट करत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राबरोबरच बीड जिल्हयाचीही मान अभिमानाने उंचावली होती. सरकारी नोकरीत सामावलेले इतर क्रीडापटू
- ललिता बाबर (धावपटू) - उपजिल्हाधिकारी
- मोनिका आथरे (धावपटू) - लिपीक
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























