(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ध्यात 'कोल्ड रुम'ची सुविधा, उष्माघाताच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज
सामान्य रुग्णालयातील या कोल्ड रुममध्ये कुलर्स लावण्यात आले आहेत. रुमचं वातावरण थंड राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
वर्धा : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात तर काही ठिकाणी तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशा वाढत्या तापमानात उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात आरोग्य यंत्रणेच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात 'कोल्ड रुम' तयार करण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयातील या कोल्ड रुममध्ये कुलर्स लावण्यात आले आहेत. रुमचं वातावरण थंड राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. उष्माघाताची लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसह उपचारही केले जातात. उष्माघाताच्या रुग्णांकरिता आवश्यक औषधेदेखील ठेवण्यात आली आहेत. उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही अशी सुविधा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
VIDEO | तापमानाचा एकच घाव... झटक्यात आम्लेट पाव | अकोला | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझावर्धा जिल्ह्यातील 45 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून जिल्हा सामन्य रुग्णालयात कोल्ड रुम तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली आहे.
वाढत्या तापमानाचा फटका वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, रुग्ण यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याचं आवाहनही मडावी यांनी केलं.