एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

CNG : बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन; उस्मानाबादच्या साखर कारखान्याचा यशस्वी प्रयोग

CNG production from biogas : साखर कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन करण्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात यशस्वी झाला आहे. हा देशातला पहिला प्रयोग असावा.

CNG production from biogas : साखर कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन करण्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात यशस्वी झाला आहे. हा देशातला पहिला प्रयोग असावा. या कारखान्यातून रोज 5 टन सीएनजी उत्पादन होत आहे.  या उपपदार्थामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनामागे 50 ते 100 रूपये अधिक भाव मिळू शकतो. याच कारखान्यात ट्रॅक्टर सीएनजीवर चालवण्याचेही परीक्षण यशस्वी झाले आहे. असे सीएनजी महाराष्ट्रातल्या किमान 75 साखर कारखान्यात करता येवू शकेल, असा दावा केला जात आहे.  

डिस्टीलरी स्पेंट वॉशपासून बायोगॅस आणि बायोगॅसचे शुद्धीकरण करून CNGतयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात बी बी ठोंबरे यांच्या पुढाकाराने हा प्रयोग यशस्वी होऊ शकला आहे. 

साखर कारखान्यातला उपपदार्थ म्हणून पर्यावरणपूरक तसेच भविष्याचे इंधन म्हणून बायोसीएनजीला मोठी मागणी आहे. 100 KLPD क्षमतेच्या डिस्टीलरीपासून साधारणपणे 5 हजार घन मीटर एवढा बायोगॅस बनतो. त्याच्या 60 टक्के प्रमाणे 3 हजार घन मीटर एवढा बायोसीएनजी तयार होवू शकतो. CNG ची किंमत प्रति किलो सरासरी 80 रूपये किलो आहे. अशा 25 ते 30 मेट्रीक टन क्षमतेच्या सीएनजी प्रकल्पापासून दररोज 20 ते 25 लाखाचे उत्पन्न होईल..

नॅचरल शुगरमध्ये रोज 5 टन सीएनजी

सध्या नॅचरल शुगरमध्ये रोज 5 टन सीएनजी तयार होत आहे. हा सीएनजी लातूरला पाठवला जात आहे.  सीएनजी बरोबरच नॅचरल शुगर पुढच्या गाळप हंगामापासून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर्ससाठी बायो-सीएनजी वापरणार आहे. सीएनजी ट्रॅक्टरचे परीक्षण झाले आहे.
 
नॅचरल शुगर मध्ये आणखी सीएनजी उत्पादन वाढवण्यात येणार आहे. कारखान्यावरचा सीएनजी पंप लवकरच सुरू होत आहे. कारखान्यांकडचा सीएनजी एचपीसीएल कंपनी विकत घेत आहे. या नव्या उपपदार्थामुळे शेतकऱ्यांना टनामागे 50 ते 100 रूपये अधिक देता येतील. असे प्रकल्प किमान 75 साखर कारखान्यात सूरू होवू शकतात. यामुळे सीएनजीसाठी सध्या लागत असलेल्या रांगा कमी होतील. पर्यावरणाचे रक्षण आणि शेतकऱ्यांना फायदा असे तिहेरी लाभ होईल, असंही सांगितलं जात आहे. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणीTufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
Embed widget