एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray : दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Live addressing) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं ठाकरे म्हणाले.

मुंबई : आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये काळजी घेणं गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, असं ठाकरे म्हणाले. आज त्यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं.

मंदिरं कधी उघडणार? प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मंदिरावरुन माझ्यावर टीका केली जाते. मात्र राज्यातील लोकांसाठी आपण मंदिरं उघडायला उशीर करत आहोत. मात्र लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील असं ठाकरे म्हणाले.

मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे 4 दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असं ठाकरे म्हणाले.

दिवाळीत फटाकेबंदीवर मुख्यमंत्री ठाकरेंचं महत्वाचं भाष्य, म्हणाले...

ठाकरे म्हणाले की,  मंदिर उघडणारच आहोत... परंतु त्यासाठी नियमवली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असं ठाकरे म्हणाले.

मास्क घातला नाही तर दंड करावाच लागणार ते म्हणाले की, मास्क घातला नाही तर दंड करावाच लागणार. एक कोरोना रुग्ण गर्दीत फिरला मास्क न लावता तर 400 लोकांना संक्रमित करू शकतो. ते पुढे किती करतील, याचा विचार करा. हे मी डॉक्टरांशी, तज्ज्ञांशी बोलुन सांगत आहे. त्यामुळे मास्क अनिवार्यच आहे. 60000 लोकांनी अहोरात्र, स्वत:च्या जीवाची मेहनत केलीत. त्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवली, म्हणून कोरोना नियंत्रणात आला. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. कोरोना योद्ध्यांना सलाम!, असं ते म्हणाले.

CM Uddhav Thackeray : दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे

उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी ते म्हणाले की, मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे 4 दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असं ठाकरे म्हणाले.  ठाकरे म्हणाले की,  मंदिर उघडणारच आहोत... परंतु त्यासाठी नियमवली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असं ठाकरे म्हणाले. दिवाळीत फटाकेबंदीवर मुख्यमंत्री ठाकरेंचं महत्वाचं भाष्य दिवाळीत फटाकेबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फटाकेबंदीबाबत बोलताना ते म्हणाले की, फटाक्यांवर बंदी आणता येईल, परंतु स्वत:हुन आपण बंधन घालून घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्ही बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  डॉक्टर्स, अन्य यंत्रणा यांच्यावर खूप ताण आहे. हे ते कुणासाठी करत आहेत? तुमच्यासाठीच ना? आपली आजवरची मेहनत प्रदुषणामुळे  व्यर्थ जायला नको. ते म्हणाले की, बंदी आणून मी तुमच्यावर आणीबाणी नाही आणत आहे. एक दुसर्‍याच्या विश्वासावर हा आनंद, सण साजरा करू. अन्य ठिकाणी प्रदुषण अधिक आहे. कोरोना आजार श्वसन संस्थेशी निगडित आहे. प्रदुषणामुळे जर हा आकडा वाढत असेल तर दिवाळीत आपण फटाके वाजवणं थांबवू शकतो का? आपण जिद्दीने हा आलेख खाली आणला आहे.  आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे, राज्यातही नियंत्रणात आला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दुसरी लाट ही लाट नाही त्सुनामी

ते म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू आला होता. त्याही वेळेला काही कोटी बळी गेले होते. असं म्हणतात आपल्या देशात 1 कोटींच्या आसपास लोक बळी गेले होते. तेंव्हाची लोकसंख्या काय होती? मी घाबरवत नाही परंतु सतर्कतेची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी आकडा शून्यावर येऊन पाश्चिमात्य देशात परत वाढला. इटली, इंग्लंड, स्पेन अनेक देश पहा. काही ठिकाणी तर घरातही मास्क घालणे बंधनकारक आहे. परत लॉकडाऊन केला आहे. दुसरी लाट ही लाट नाही त्सुनामी आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget