एक्स्प्लोर

 Cm Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, वाचा भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Cm Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरील दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची होती म्हणून शिवसेनेचं पाणीपत केलं, असा आरोप एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

Cm Eknath Shinde Dasara Melava :  मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 40 आमदार आणि 12 खासदारांनी तुम्हाला सोडलं. राज ठाकरे आणि नाराणय राणे यांनी तुम्हाला सोडलं, मग तुम्हीच आत्मपरीक्षण करा की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची होती म्हणून तुम्ही शिवसेनेचं पाणीपत केलं, असा आरोप यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. 

-बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली, त्यामुळं शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला ही भूमिका घेतली, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.   

-आम्ही केलेली गद्दारी नाही, हा गदर आहे, गदर म्हणजे क्रांती, आम्ही क्रांती केली, शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही क्रांती केली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

-तुम्ही तर बापालाच विकलं, सत्तेसाठी तुम्ही हिंदूत्वाला तिलांजली दिली त्यामुळे तुम्हीच गद्दार आहात. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलंय त्याला महाराष्ट्रातील जनता कदापी विसरणार नाही. आमचे विचार बलले नाहीत तर तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात, असा हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. 

-शिवसेनेला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 40-40 वर्षे आम्ही खस्ता खाल्या. त्यासाठी आम्ही आंदोलनं केली, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या तुरूंगात गेलो, घरावर तुळीपत्र ठेवलं  त्यांना आज तुम्ही गद्दार म्हणत आहात, आम्ही गद्दार नाही तर खरे गद्दार तुम्हीच आहात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.  

-बाळासाहेबांनी ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली, त्यामुळं शिवसेना वाचवण्यासाठी आम्हला ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेताना आम्हाला आनंद झाला नाही तर दुख: झालं. जे शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही  गेलात हीच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणं आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

-ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे. आम्ही घेतलेला निर्णय योग्य  आहे म्हणूनच एवढी गर्दी या मैदानावर जमली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

-40 आमदार आणि 12 खासदारांनी तुम्हाला सोडलं. राज ठाकरे आणि नाराणय राणे यांनी तुम्हाला सोडलं, मग तुम्हीच आत्मपरीक्षण करा की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची होती म्हणून तुम्ही शिवसेनेचं पाणीपत केलं, पण शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला हा उठाव करावा लागला, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.  

-मी स्वत: हून  ग्रामीण भागातील आमदारांना भेटत होतो, बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत देत होती हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही. तुमचा कारभार जनतेला आवडला नाही. कोरोनाच्या नावाखाली तुम्ही सगळं बंद केलं परंतु, तुमचं सर्व सुरू होतं, असा टोला यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

-शिवसेनेचा झेंडा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा अजेंडा असं मंत्रालयात सुरू होतं. उद्धव ठाकरे यांच्या नावापुढं फक्त मुख्यमंत्री पाटी लागली. परंतु, हे सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसवचे नेतेच चालवत होते, असा आरोप यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

-पाकिस्तानच्या नावांनं दिल्या जाणाऱ्या घोषणा महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाहीत. राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल, PFI बाबत पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. परंतु, पीएफआयवर बंदी घातल्यानंनतर आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी हास्यास्पद आहे. आरएसएसचं राष्ट्र उभारणीत महत्वाचं योगदान, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यावेळी म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP : राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी
शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी
Vaishnavi Hagawane Case : अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताय, 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताय, 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी
शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी
Vaishnavi Hagawane Case : अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताय, 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताय, 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
hdfc bank bonus shares : एचडीएफसी बँकेला पहिल्या तिमाहीत 18155 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, बोनस शेअर देखील देणार
एचडीएफसी बँकेला पहिल्या तिमाहीत 18155 कोटींचा नफा, शेअरधारकांना डबल गिफ्ट, लाभांश अन् बोनस शेअर मिळणार
Manoj Jarange Patil: जुनी म्हण आहे 'मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे' दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही; मनोज जरांगे पाटलांकडून स्वागत
जुनी म्हण आहे 'मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे' दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही; मनोज जरांगे पाटलांकडून स्वागत
Walmik Karad : वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल; पोलिसांनी झाडाझडती घेतली अन्...
वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल; पोलिसांनी झाडाझडती घेतली अन्...
Congress on PM Modi: ट्रम्प 24व्यांदा म्हणाले, मी युद्ध थांबवलं अन् आता 5 विमाने पडल्याचा सनसनाटी दावा; काँग्रेसनं तीन प्रश्न विचारत मोदींना पुन्हा घेरलं
ट्रम्प 24व्यांदा म्हणाले, मी युद्ध थांबवलं अन् आता 5 विमाने पडल्याचा सनसनाटी दावा; काँग्रेसनं तीन प्रश्न विचारत मोदींना पुन्हा घेरलं
Embed widget