एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
hdfc bank bonus shares : एचडीएफसी बँकेला पहिल्या तिमाहीत 18155 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, बोनस शेअर देखील देणार
HDFC Bank : ने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत 18155 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. याशिवाय शेअर धारकांना लाभांश देखील जाहीर झाला आहे.
एचडीएफसी बँक
1/6

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 मधील पहिल्या तिमाहीतील निकाल जाहीर केले आहेत. बँकेला एप्रिल- जून तिमाहीत 18155.21 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
2/6

एचडीएफसी बँकेनं गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 12.24 टक्के अधिक नफा मिळवला आहे. जाणकरांना बँकेला पहिल्या तिमाहीत 17385 कोटींचा नफा मिळेल अशी अपेक्षा होता. तर बँकेचं स्टँडअलोन नेट इंटरेस्ट इन्कम 5.4 टक्क्यांनी वाढून 31438 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
3/6

एचडीएफसी बँकेचं ऑपरेटिंग प्रॉफिट देखील चांगलं राहिलं. या तिमाहीत ते 35734 कोटी रुपयांवर पोहोचलं. प्रोविजन्स मध्ये देखील वाढ पाहायला मिळाली ते 14442 कोटी रुपयांवर पोहोचलं. यामध्ये 9 हजार कोटींच्या फ्लोटिंग प्रोविजन्स आणि 1700 कोटींच्या कंटिंजेंट प्रोविजन्सचा समावेश आहे.
4/6

दुसरीकडे बँकेनं शेअरधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या बोर्डानं प्रतिशेअर 5 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. याशिवय 1:1 बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.हा लाभांश आणि शेअर ज्यांना मिळेल ज्यांचं नाव 25 जुलै 2025 ला रजिस्टरमध्ये असेल त्यांना मिळेल. लाभांश 11 ऑगस्टला मिळेल. बोनस शेअर इश्यू करण्यासाठी शेअरधारक आणि नियामकांची मंजुरी मिळणं आवश्यक आहे. यासाठी 27 ऑगस्ट रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
5/6

बँकेची सहायक कंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आयपीओतून देखील चांगला फायदा झाला आहे. आयपीओतून बँकेला करपूर्व नफा 9128 कोटी रुपयांचा झाला. ऑफर फॉर सेलद्वारे विकलेल्या शेअरमधून बँकेला नफा झाला. एका वर्षाच्या तुलनेत नफा थोडा कमी होऊन तो 16258 कोटी रुपयांवर आला. जो गेल्या वर्षीच्या तिमाहीत 16,475 कोटी रुपये होता. एचडीएफसी बँकेचा शेअर 1959 रुपयांवर आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 19 Jul 2025 05:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















