(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, मुख्यमंत्र्याचं लोकसभा अध्यक्षांना पत्र; किर्तीकरांची नेतेपदी निवड
Sanjay Raut : शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना हटवले आहे.
Sanjay Raut : शिसवेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे.
Gajanan Kirtikar: किर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास...
सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच, किर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते. संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण 18 खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या
निवडणूक आयोगानं पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने हालचाली गतिमान केल्या आहेत. आता शिंदे गटाकडून संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांची संसदेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
किर्तीकरांच्या शिंदे गटात प्रवेश हा ठाकरेंना धक्का
मागील काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच आणखी खासदाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
किर्तीकरांचे सुपुत्र अमोल किर्तीकर उद्धव ठाकरेंसोबत
गजानन किर्तीकर यांनी जरी शिंदे गटात प्रवेश केला, असला तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केली. यावेळी राऊत असे म्हणाले होती की, 100 दिवस तुरुंगात राहून सुटका झाल्यावर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षाही अधिक आनंद अमोल किर्तीकरांच्या शिवसेनेत राहण्याचा झाला आहे. अमोल किर्तीकर यांनी वडील गजानन यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, असेही राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या इतर बातम्या :