उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज होते का? मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच बोलले
Eknath Shinde : उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस थोडे नाराज होते, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस थोडे नाराज होते, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले आहे. सत्कार झाल्यानंतर ठाण्यात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सरकार कसे बनवले त्यापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का? या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज होते का?
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव घेतलं. ते त्यांना आणि मला माहित होतं. ते खूश होते, पण त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले की उपमुख्यमंत्री पद घ्या. त्यावेळी ते थोडे नाराज दिसत होते, मी म्हणालो त्यांना तर ते म्हणाले की पक्षाने मला सर्व काही दिले, त्यांचे आदेश मला मान्य आहेत. मी त्यांना म्हणायचो किती काम करता तुम्ही, तर ते म्हणायचे कितीही काम केले तरी तुमच्या इतके काम मी करू शकत नाही.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी चूक केली का?
ते मी नाही सांगू शकत, ज्याचे त्याने ठरवावे
अडीच वर्षापूर्वी अमित शाह यांनी बंद खोलीत मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले होते का?
मोदी मला म्हणाले, जर बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवू शकतो, तुम्हाला 50 आमदार असताना मुख्यमंत्री बनवू शकतो. तर शब्द दिला असता तर का बनवले नसते?
आम्ही युतीत असताना निवडणूक लढवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"आम्ही युतीत असताना निवडणूक लढवली, बाळासाहेब, मोदी यांचा फोटो लावून निवडणूक लढवली त्यानंतर महाविकस आघाडी झाली आणि बाळासाहेबांचा आदेश मानणारे आम्ही होतो म्हणून आम्ही ते सहन केले. नंतर खच्चीकरण सुरू झाले. आम्ही सगळं पाहत होतो. मी उद्धव ठाकरे यांना समजावून सांगितले, आमदारांची भावना सांगितली".
तुम्हाला मी सांगतो, खूप लोक संपर्कात आहेत. देवेंद्रजी आणि माझ्यापण पण आम्हाला त्यांची गरज नाही. विधानपरिषदेत पहिल्या दिवशी 107 मते होती, दुसऱ्या दिवशी ती 99 झाली, ही कलाकार मंडळी आहेत. राज्यसभेत जितकी मते आम्हाला हवी होती तितकी मिळाली नाही, एक माणूस पराभूत झाला, पण चुकीचा माणूस पराभूत झाला. आम्ही जी भूमिका घेतली ती अडीच वर्ष आधी घ्यायला हवी होती, तेव्हा चुकीचे काम झाले ते आम्ही दुरुस्त केले.
भाजपला सोडून उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जुळवून घेणार का?
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, बाळासाहेब म्हणाले होते यांच्यासोबत आपण कधीच जाणार नाही, मग माझं चुकलं कुठे? ज्यांच्या सोबत निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत आम्ही गेलो, मग चुकलं कोण? राष्ट्रवादी म्हणत होती पुढचा मुख्यमंत्री आमचा आहे, शंभरपेक्षा जास्त निवडून येऊ. सुरुवातीचे 3 दिवस मी झोपलो नव्हतो, आमचा प्रवास मुंबई टू ठाणे, ठाणे ते सुरत असा झाला, मला टेन्शन असणारच.
देवेंद्र फडणवीस यांच्यात काय गुण आहेत, की तुम्ही प्रेमात आहात?
मी काम करणाऱ्या माणसांच्या प्रेमात असतो, मी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केले, त्यांचा अभ्यास, त्यांची भाषणे, मी ऐकत होतो. माझ्याकडे एम एस आर डी सी खाते होते. त्यावर साडेसहा हजार कोटी कर्ज होते, मी किती वेळा त्यांच्याकडे गेलो, हे खाते मला नको पण त्यांनी मला खूप काम दिले. समृध्दी महामार्ग आम्ही केला.
ज्याचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री असे समीकरण तुम्ही काय वशीकरण करून बदलले?
परिस्थिती. परिस्थितीनुसार समीकरणे बदलत असतात. मला मुख्यमंत्री केले ते भारतीय जनता पक्षाने. मी तसा मानपाणवाला माणूस नाही, मला इगो नाही.
देवेंद्र फडणवीस नाराज होते का?
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव घेतलं. ते त्यांना आणि मला माहित होतं. ते खूश होते, पण त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले की उप मुख्यमंत्री पद घ्या. त्यावेळी ते थोडे नाराज दिसत होते, मी म्हणालो त्यांना तर ते म्हणाले की पक्षाने मला सर्व काही दिले, त्यांचे आदेश मला मान्य आहे. मी त्यांना म्हणायचो किती काम करता तुम्ही, तर ते म्हणायचे कितीही काम केले तरी तुमच्या इतके काम मी करू शकत नाही.
तुम्हाला जे जमले ते अजित पवार यांना का जमत नाही?
त्यांनी एकदा प्रयत्न केला होतं ना?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
