एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काहींचा शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पण काही लोकांना शेतकऱ्यांच्या नावानं राज्यात अराजक पसरवायचं आहे, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्यात काही लोकांना अराजक पसरवायचं आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा संप संपूच, नये असं वाटतं. म्हणून ते शेतकऱ्यांच्या आडून राजकरण करत आहेत. पण राज्य सरकार आपलं काम करत राहिल.''
शिवसेना आणि राजू शेट्टी यांनी शेतकरी संपाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करण्याची भूमिका घेतली. पण त्यांनी माझाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली नाही. त्यांच्याच पक्षाचेच नेते सदाभाऊ खोत मंत्रिमंडळात असाताना त्यांनी ही भूमिका घेतली.''
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्य सरकारनं कित्येक पटीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच ही कर्जमाफी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात पहिला मिळेल. शिवाय देशातील कोणत्याही राज्यातल्या राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी दिलेली नाही,'' असंही त्यांनी यावेळी स्पष्टं केलं.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे
LIVETV : विदर्भ आणि मराठवाड्यातील 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक : मुख्यमंत्री LIVETV : काही लोकांना प्रश्न चिघळत ठेवण्यात जास्त स्वारस्य आहे : मुख्यमंत्री LIVETV : राजू शेट्टी आमच्याशी चर्चा करण्यास तयार नाहीत : मुख्यमंत्री LIVETV : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना सर्वात आधी कर्जमाफी मिळाली पाहिजे : मुख्यमंत्री LIVETV : देशातील कुठल्याही राज्यात सरसकट कर्जमाफी झालेली नाही : मुख्यमंत्री LIVETV : महाराष्ट्रात कित्येक पटीनं आम्ही कर्जमाफी करणात आहोत : मुख्यमंत्री LIVETV : काही लोकांना राज्यात आराजक पसरवायचं आहे : मुख्यमंत्री LIVETV : काही लोकांना शेतकऱ्यांचा संप संपू नये असं वाटतं : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर मुलाखत पाहा
संबंधित बातम्याशेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु : जयाजी सूर्यवंशी
शेतकरी संपात फूट पाडल्याच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement