एक्स्प्लोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन

मुंबई: नाणिजमधली उपस्थिती ही विचाराअंती लावल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 'एबीपी माझा'च्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन समिटमध्ये ते बोलत होते. 56 हजार लोक देहदान करत असताना, त्यांच्या उपक्रमाचं कौतुक करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, आणि त्यामुळेच आपण नाणिजला गेलो होतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. इतकंच नाही, तर बाबा बोडके कोण होता, हे माध्यमांमध्येच छापून आल्यानंतर आपल्याला समजल्याची प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय एकीकडे सीमेवर आपले जवान शहीद होत असताना, पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करु नये, अशी जनभावना आहे. त्यामुळे निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांनी यापुढे घातलेल्या बंदीचं आपण स्वागत करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मला कुठेही जाताना हेल्मेट घालून जावं लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानांचा समाचार घेतला.. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन समिट' या कार्यक्रमात मुख्यमंत्री आगामी कार्यकाळातल्या महाराष्ट्राचं व्हिजन मांडलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन :
- आधीच्या ‘व्हिजन’मध्ये जे मांडलं, त्याच मार्गाने पुढे चाललो आहे – मुख्यमंत्री
- फक्त कापूस उत्पादन नाही, कापड उत्पादनासाठी मोठी योजना : मुख्यमंत्री
- 2 वर्षात 76 लाख शेतकऱ्यांनी विम्याच कवच घेतलं, धरणांसोबत शेततळी आणि विहिरी हव्या
- अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक निवाऱ्यासाठी विशेष तरतूद : मुख्यमंत्री
- मेट्रो, मोनो, लोकल आणि बेस्टसाठी एकच तिकीट प्रणाली : मुख्यमंत्री
- एका वर्षात आम्ही मुंबईमध्ये सीसीटीव्हीचं जाळं पसरवलं : मुख्यमंत्री
- कौशल्य विकास योजनेअंतर्गत राज्यातल्या कुशल हातांना काम : मुख्यमंत्री
- मराठा समाजाच्या मागण्या योग्य
- मराठा मोर्चे सरकारविरोधी नाहीत, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत
- केंद्रातल्या प्रत्येक योजना राज्यात राबवणारे महाराष्ट्र राज्य
- मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे
- मराठा मोर्चातील मागण्यांकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष
- कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर
- महिलांना कौशल्य विकासाचे धडे दिले
- 80 लाख नागरिकांसाठी मेट्रोचं जाळं
- सरकारी अधिकाऱ्यांचं मुल्यमापन करण्यासाठी नवी प्रणाली
- राज्यातील 24 जिल्हे समृद्धी कॉरिडॉरने मुंबईशी जोडणार
- शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
- उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या स्थानी
- अनुदान लाटणाऱ्यांवर कडक कारवाईचा सरकारचा प्रयत्न
- वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर
- जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना फायदा
- योग्य तपास करुन सिंचन घोटाळ्यातील दोषींना शिक्षा करु
- अनुदानाच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार कटिबद्ध
- सर्वात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात
- उद्योगातील पाण्याचा पुनर्शुद्धीकरण अनिवार्य करणार
- आधीच्या सरकारकडून कंत्राटदारांच्या फायद्याचे टोल करार
- योजनांच्या अंमलबजावणीसाठी केआरएम सिस्टिम सुरु
- पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार
- टोलविरोधात कोर्टात जिंकलो पण आधीच्या करारांमुळे अडचण
- माझ्याइतका हसतमुख मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नसेल
- महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी
- पाकिस्तानी कलाकारांबाबत फिल्म निर्मात्यांची भूमिका स्वागतार्ह
- नाणिजला पूर्ण विचारा अंती गेलो
- 56 हजार लोकांनी देहदानाचा संकल्प केल्याने नाणिजमध्ये उपस्थिती
- कोणत्याही गुंडाला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही
- बाबा बोडके कोण हे माध्यमांकडून कळालं
- मी केवळ फुल टाईम गृहमंत्री नाही, तर ओव्हरटाईमही गृहमंत्री
- माझ्या कार्यकाळात गुन्हेगारांना शिक्षेचं प्रमाण जास्त
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























