एक्स्प्लोर

मी ‘संपूर्ण’ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वतंत्र विदर्भासाठीचं आंदोलन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अधिक तीव्र करण्याची घोषणा विदर्भवादी नेत्यांन केली असताना, मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, “मी ‘संपूर्ण’ महराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.” ते एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते.     विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांकडे इतक्या वर्षात म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं. मग आता या भागांना मदत केल्यास टीका का केली जाते? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.     पाणलोट क्षेत्राचा विकास महत्त्वाचा, जागितक बँकेचीही मदत : मुख्यमंत्री     “जलसंधारणातून पाणलोट क्षेत्राचा विकास करुन विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणं, हाच दुष्काळमुक्तीसाठी उपाय आहे. आतापर्यंत राज्य सरकारने केवळ पैसे खर्च केले, मात्र पाणलोटाचा विकास झाला नाही. शिवाय, धरणांमुळे दुष्काळमुक्त होऊ शकत नाही, पाणलोट क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहेत. पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाची कामं करण्यासाठी जागतिक बँकेकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला, तो जागतिक बँकेने स्वीकारलाही आहे.”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ‘माझा कट्टा’वर बोलताना सांगितली.     मेट्रो कारशेडसाठी आरेबाहेरच्या जागांचीही चाचपणी सुरु : मुख्यमंत्री     मुंबई मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड करणार की नाही, यावरुन वाद सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मेट्रो सुरु होणं हे मुंबईकरांसाठी अत्यंत फायद्याचं आहे. कारण गाड्यांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहेत. त्यामुळे या कारशेडच्या परिसरातील झाडं तोडून इतर ठिकाणी लावणं, योग्य पर्याय होईल की अधिकचा खर्च उचलून रस्ता बदलणं योग्य, याचा मुंबईकरांनीच विचार करावा. मात्र, मेट्रो कारशेडसाठी आरेबाहेरच्या जागांचीही चाचपणी सुरु आहे.”     विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही: मुख्यमंत्री     नीट परीक्षा लागू करुन सरकार कुठल्याही स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा 2018 पासून लागू करा अशी मागणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहे. यासाठी उद्या सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. इतर राज्यांचाही नीट परीक्षेवर आक्षेप असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.     राहुल आवारेला ऑलिम्पिकमध्ये पाठवणारच: मुख्यमंत्री     “महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेवर अन्याय होऊ देणार नाही. कुस्ती परिषदेतील राजकारणाचा राहुलला फटक बसला असून, त्याला ऑलिम्पिकमध्ये कुठल्याही परिस्थितीत पाठवू.”, असे मुख्यमंत्री फडणवीस ‘माझा कट्टा’वर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget