एक्स्प्लोर
...म्हणून मुख्यमंत्री टपरीवरच चहा प्यायले!
इंदापूर (पुणे) : सुरक्षेचा फौजफाटा आणि कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तिसऱ्यांदा आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी आले होते. कुलदैवताचे दर्शन झाल्यावर नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दशरथ राऊत यांच्या छोट्याश्या टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेतला. यामुळे राज्याचं महत्वाचं पद मिळाल्यानंतरही आपल्या टपरीला देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत, याचं समाधान राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुलदैवतेच्या दर्शनासाठी ज्या-ज्या वेळी निरा नरसिंहपूर येथे येतात, त्यावेळी दशरथ राऊत यांच्या लक्ष्मी नृसिंह हॉटेलमध्ये चहा घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही न चुकता या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी ते येतात. आजही मुख्यमंत्र्यांनी हा शिरस्ता न मोडता राऊतदादांच्या हॉटेलमध्ये त्यांच्या आग्रहास्तव चहा घेतला.
लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या पायथ्याशी चहाचे छोटेशे स्टॉल आहे. दरवर्षी देवेंद्र फडणवीस आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी नागपूरहून इथे येतात. लक्ष्मी नृसिंह मंदिरात दर्शन घेल्यावर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दशरथ राऊत यांच्या यांच्या चहाच्या स्टॉलवर येऊन विसावा घेतात आणि दशरथ राऊत यांच्या हाताने बनवलेला चहा घेऊन फ्रेश होतात.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतरही दोनवेळा त्यांनी याच स्टॉलवर चहा घेतला. यावेळीही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या चहाच्या टपरीवर चहा घेण्याची जिद्द सोडली नाही. दशरथ राऊत यांचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement