एक्स्प्लोर
Advertisement
विरोधक वैफल्यग्रस्त अवस्थेत, मुख्यमंत्र्यांची टीका
या अधिवेशनात 11 विधेयक प्रस्तावित आहेत. विधानपरिषदेत आणि विधानसभेत एकूण 16 विधेयक मांडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई : कुठलाही अभ्यास न करता आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत सत्तेपासून दूर गेल्याने येन-केन प्रकारे सरकारवर टीका करण्याची विरोधकांची मानसिकता आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशणा साधला. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सकारात्मक विरोधी पक्ष व्हावं अशी माझी त्यांना सूचना आहे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.
मंत्रालय आणि परिसरात आत्महत्या होणं अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनांना गांभीर्याने घेतलं पाहिजे, पण गौरवण्यात येऊ नये, असे धर्मा पाटील यांच्या आत्महत्येसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी, आत्महत्यात संधी शोधणारे विरोधी पक्ष मी याआधी कधीच पहिला नव्हता, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
“धर्मा पाटील यांची आत्महत्या दुर्दैवीच आहे. परंतु त्यांचे प्रकरण आघाडी सरकारच्या काळातलं आहे. आम्ही त्यांच्या आत्महत्येआधीच दोन बैठका घेतल्या होत्या. सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला.”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या अधिवेशनात 11 विधेयक प्रस्तावित आहेत. विधानपरिषदेत आणि विधानसभेत एकूण 16 विधेयक मांडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भूसंपादन कायद्यासंदर्भातील महत्वाच्या विधेयकात सुधारणा करु, तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत पद्धतीत पारदर्शकता आणि अधिकार वाढीचा कायदा मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफी योजना अतिशय पारदर्शकपणे पूर्णत्वास नेत आहोत. कर्जमाफीसाठी ज्यांना अर्ज भरता आला नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ. 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत ही संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement