एक्स्प्लोर

केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : आरोपपत्रात संग्राम जगतापांचं नाव नाही

तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात नावं समावेश होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.

अहमदनगर : सीआयडीकडून अहमदनगरमधील केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अखेरच्या क्षणी 90 व्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयात हे 1366 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दहा आरोपींपैकी आठ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आरोपपत्रात दोघांचा सध्या समावेश करण्यात आलेला नाही, मात्र पुरवणी दोषारोपपत्रावर भवितव्य ठरणार आहे. तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात नावं समावेश होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. तर भानुदास कोतकर, संदीप गुंजाळ, विशाल कोतकर, रवींद्र खोल्लम, बाबासाहेब केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप गिऱ्हे आणि महावीर मोकळ यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे. हत्या आणि हत्याचा कट, आर्म अॅक्टसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं. काय आहे प्रकरण? केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची सात एप्रिलला गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या राजकीय वादातून ही हत्या झाली होती. संदीप गुंजाळसह चौघांनी हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी गुंजाळला अटक करण्यात आली होती. तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र मृतांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर आक्षेप घेतल्याने तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, व्याही भानुदास कोतकर, संदीप कोतकर आणि विशाल कोतकरसह 36 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या, हत्येच्या कटासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आमदार संग्राम जगतापसह दहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, बी एम कोतकर, रवी खोल्लम, संदिप गिर्‍हे, महावीर मोकळ, विशाल कोतकर आणि बाबासाहेब केदार न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या प्रकरणी आमदार अरुण जगताप यांना अद्याप अटक झाली नसून ते फरार आहेत. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विशाल कोतकर निवडून आला होता. मात्र सायंकाळी दोघा शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली. यानंतर शिवसैनिकांनी केडगावला रस्ता रोको आंदोलन करुन मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी जमावाने एसपी कार्यालयाची तोडफोड करुन संग्राम जगताप यांना घेऊन गेले होते. या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Medha Kulkarni Pune : मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंगAnjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Embed widget