एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वाशिमच्या माळेगावात चूलबंद आंदोलन

वाशिम : सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी वाशिमच्या माळेगावात चूलबंद आंदोलन करण्यात आलं. आज (शुक्रवार) सकाळी या गावातल्या एकाही घरात चूल पेटली नाही. संपूर्ण गावानं उपाशी राहून सरकारचा निषेध करत चक्का जाम आंदोलन केलं. राज्यात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. सकाळी वाशिम-सेलूबाजार रस्त्यावर चक्काजाम करून आंदोलन करण्यात आलं, राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्यातील अनेक घटकांनी आपला पाठिंबा आणि समर्थन दिले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या समितीचं काम चालेल. ही समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करुन आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या या समितीत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे. ही समिती सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कुठलाही प्रश्न संवादातून सोडवला जाऊ शकतो, त्यामुळे शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. तसंच उच्चाधिकार मंत्रिगटाशी चर्चेतून शेतकऱ्यांनी मार्ग काढावा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. संबंधित बातम्या: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा: राजू शेट्टी अमरावतीत मुनगंटीवारांच्या गाडीवर कांदे फेकले सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम शेतकरी संप देशस्तरावर नेणार: खा. राजू शेट्टी

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

Embed widget