हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं, नेमकं काय घडलं?

हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळी खाली ट्रक उभा होता. ट्रकच्या पुढच्या बाजूवरच हेलिकॉप्टरचा काही भाग कोसळल्यामुळे ट्रकचंही नुकसान झालं आहे. मुख्यंत्र्यांची प्रतिक्रिया “मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे.
आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही.
डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे.
ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद
माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे.
काळजी करण्याचं कारण नाही,”
अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.
नागरी हवाई उड्डाण संचालनालयची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्व सहा जण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली.
संबंधित बातम्या
लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं
मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?























