एक्स्प्लोर

Child Marriage : धक्कादायक! नंदूरबार जिल्ह्यात अडीच वर्षात तब्बल 10 हजार बाल विवाह

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक दहा हजार मुलींचा बाल विवाह (Child Marriage) झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

Child Marriage Nandurbar : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक दहा हजार मुलींचा बाल विवाह (Child Marriage) झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यापैकी 2 हजार 305 मुलींना अठरा वर्षाच्या आत मातृत्व आले आहे. जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे समोर आले आहे .सामाजिक रुढी परंपरांच्या नावाखाली अधिकारी आता आपली जबाबदारी झटकत असल्याचे समोर आलं आहे. राज्य सरकारनं बाल विवाह रोखण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या असतानाही हे वास्तव नंदूरबार जिल्ह्यातून समोर आलं आहे.

Child Marriage : धक्कादायक! नंदूरबार जिल्ह्यात अडीच वर्षात तब्बल 10 हजार बाल विवाह

52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आलं

नंदूरबार जिल्ह्यात तब्बल दहा हजार मुलींचा बाल विवाह झाल्याचे समोर आले आहे. यातील जवळपास 2 हजार 305 मुली या अठरा वर्षाच्या आत गर्भवती होऊन आई झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मंगळवारी नंदूरबार जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधरण सभेत महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा अधिकृत आकडा जाहीर केला आहे. कुपोषणावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात मोठी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच कुपोषणासाठी बालविवाह हे मोठे कारण ठरत असल्याचे सांगत विभागाच्या वतीने हे आकडे जारी करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील 52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील 9 हजार 983 मुलींचा म्हणजे 18.96 टक्के मुलींचा बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे बाल विवाह रोखण्याची जबाबदारी ज्या महिला बालकल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेची असते, मात्र त्यात हलगर्जीपणा असल्याचे म्हटले जात आहे.

Child Marriage : धक्कादायक! नंदूरबार जिल्ह्यात अडीच वर्षात तब्बल 10 हजार बाल विवाह

जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, दुसरीकडं राज्य सरकारनं बाल विवाह रोखण्यासाठी विविध जबाबदारी निश्चिती केल्या होत्या. त्यात गावात होणाऱ्या बाल विवाहासाठी सरपंच पोलीस पाटील यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बाल विवाह झाले असल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. तर प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारभारावर या कारणावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या प्रमाणात बाल विवाह होत असतील तर महिला बालकल्याण आणि ग्रामपंचायत विभाग यांनी ही माहिती वेळीच का पुढे आणली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगेAjit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Embed widget