एक्स्प्लोर

Rupali Chakankar : नाशिकमध्ये वर्षभरात एकच बालविवाह, बालविवाह आढळल्यास थेट सरपंचावर कारवाई, रुपाली चाकणकर यांचा इशारा

Rupali Chakankar : नाशिक (Nashik) शहरात वर्षभरात अवघा एकच बालविवाह (Child Marriage) झाला, बालविवाह आढळल्यास थेट सरपंचावर (Sarpancha) कारवाईचा इशारा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला आहे.

Rupali Chakankar : नाशिक (Nashik) शहर पोलिसांकडे (Nashik Police) कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, सोशल मीडियावर अश्लील टीका संदर्भात 1200 तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी गांभीर्य ओळखत कारवाई सुरू केली. पोलिसांनी 1200 पैकी 740 तक्रारी निकाली काढल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तर नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने सुरु केलेला सायबर सेलच्या माध्यमातून कामगिरी उल्लेखनीय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, बालविवाह व महिलांसंबंधी असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. वाढत्या सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने सायबर सेलच्या माध्यमातून महिला तक्रार निवारणासाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. या विभागाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रार निवारण करण्यासाठी सायबर सेलची कामगिरी उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. 

राज्याच्या महिला आयोगाच्या (State Women's Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, नाशिकच्या सायबर सेलने बाराशे तक्रारीपैकी 740 तक्रारी निकाली काढल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी किंवा फसवणूक होत असलेल्या महिलांनी 1093 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. निर्भया पथकाच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागासाठी 112 टोल फ्री क्रमांकाबरोबरच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने स्वत:चे चार टोल फ्री क्रमांक तयार करुन महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी चांगल्या प्रद्धतीचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.

कौटुंबिक वाद, कौटुंबिक अत्याचाराच्या घटना मिटविण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन करुन भरोसासेल चांगल्या पद्धतीने सक्षम होते. त्यामुळे पोलीसाकडे येणाऱ्या तक्रारींचा निपटारा लवकर होण्यास मदत आहे. कोरोनाकाळात बालविवाहांचे प्रमाण वाढलेले होते. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने युद्धपातळीवर प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, संरपच यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले, असेही चाकणकर यांनी सांगितले.

वर्षभरात एकच बालविवाह 
महिला व मुलींसाठी नाशिक शहर हद्दीत 1091 आणि ग्रामीण हद्दीत 112 या क्रमांक मदतीसाठी कॉल करावा. कोरोना काळात बालविवाह आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले होते. आता ते कमी झाले आहे. शिवाय अशी घटना आढळल्यास थेट सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर नाशिक शहरात 2022 मध्ये अवघा एकच बालविवाह झाला असून पुढील वर्षी एकही बालविवाह नसेल. नाशिक शहर सायबर सेलने महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी केलेले कामकाज प्रसंशनीय असून, इतर जिल्ह्यांमध्येही नाशिक शहर सायबर सेलप्रमणे काम केले पाहिजे. नाशिक शहरापेक्षा नाशिक ग्रामीणमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. 

निर्भया पथकाचे काम कौतुकास्पद
नोकरदार, महाविद्यालयीन युवतींच्या संरक्षणासाठी निर्भया पथक सक्षमतेने काम करत आहे. निर्भया पथकाने शाळा व महाविद्यालयीन वेळे व्यतिरिक्त शिकवणीवरून येणाऱ्या मुलींच्या संरक्षणासाठी आपली कामगिरी बजावली आहे. निर्भयाचे चार पथके दोन सत्रात काम करतात. त्यामुळे महिला व मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत आहे, असेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस अंमलदार महिलांना चांगली कामगिरी केल्याबद्दल वीरकन्या म्हणून सरला खैरनार आणि ज्योती मेसट यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget