एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

डॉ. राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याती धमकी दिलीय.

नागपूर:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांनाही जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD डॅा. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याती धमकी दिली आहेय 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॉ. राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी OSD म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ. राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. 

आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार डॉ. राहुल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांना टार्गेट करत जीवे मारण्याची धमकी पत्र त्यांच्या घरी पाठवलंय.

 डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या धमकी पत्रात काय लिहिले?

जय लाल सलाम, जय किसान 

डॉ. राहुल गेठे यांना शेवटची धमकी


एकनाथ शिंदे यांचे अधिकारी डॉ.राहुल गेठे यांच्यामुळे आमचे खूप नुकसान होत आहे. आम्ही लवकरच आमच्या मृत भावांचा बदला घेणार आहोत. लाल शाईने लिहिलेल्या पत्रातून गेठे यांना जीवे
मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  

जय नक्षलवाद
भामरागड / एटापल्ली
CPI - कमिटी

 गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकास कामांचा धडाका लावला, त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नाराजीतून त्यांना एक पत्र देण्यात मिळाले आहे. 

 एकनाथ शिंदे आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

गडचिरोलीत बराच विरोध सुरू आहे तो म्हणजे सुरजागडच्या खाणकामाला.  हा स्थानिक स्तरावर असला तरी इथे खदानीच्या कामाला विरोध हा नक्षलींचाही आहे. त्यांनी ही भूमिका नुसती वेळोवेळी फक्त मांडलीच नाहीये तर इथे आधी माओवाद्यांनी जाळपोळही केलेली असून लॉईड कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची इथे हत्या ही केली आहे. त्यामुळे इथे कामबंद होते पण आता परत कामाची हालचाल सुरू झाली आहे.  शिंदे यांच्या सुरजागड दौऱ्याच्या बद्दल उल्लेख करत, त्याचे उत्तर आपण सोमाजीची हत्या करून दिले असल्याचे नमूद केले होते   पण हा फक्त ट्रेलर असून,  पिक्चर अभी बाकी है असे सूतोवाच ही केले .  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget