एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी घेतला 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा, 15 अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र, एका नवीन विक्रमाची नोंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाचा यामध्ये आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामं झाली त्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रम, तालुका स्तरापर्यंत अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करा, त्या इतरांनाही सांगा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. गुंतवणूक येत असताना गुड गव्हर्नन्स द्या, संपूर्ण कालावधीचा आढावा आल्यानंतर 1 मे रोजी याचा सार्वजनिक कार्यक्रम करु असेही फडणवीस म्हणाले. संकेतस्थळे फुलप्रूफ करा. दरम्यान, यावेळी लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

15 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र

पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटील
सातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेख
संभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रा
मुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकर
गृह, अतिरिक्त मुख्य सचिव: इकबालसिंग चहल
आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: शेखर सिंग
आयुक्त, ठाणे महापालिका: सौरभ राव
मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडे
मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सन
जिल्हाधिकारी, नागपूर: विपीन इटनकर
जिल्हाधिकारी, जळगाव: आयुष प्रसाद
विभागीय आयुक्त, पुणे: डॉ. पुलकुंडवार
आदिवासी आयुक्त: लिना बनसोडे
आयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकर
सचिव, मृद व जलसंधारण: गणेश पाटील

सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला 100  दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.  या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सरकारी योजनांची योग्य  अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या आहेत. 

 

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी कलंकित अधिकाऱ्यांची पीए आणि ओएसडीपदी नेमणूक रोखली, म्हणाले, 'फिक्सरांना मान्यता देणार नाही'

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget