शिवसेनेच्या वाटेवरून परत आणण्याचे प्रयत्न जोरात, छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर रावसाहेब दानवे यांनी घेतली राजू शिंदेंची भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला गळती लागली आहे. माजी महापौर राजू शिंदेंसह इतर पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसत आहे.
Chhatrapati Sambhajinagar: भाजप नेते राजू शिंदे (Raju Shinde) यांना शिवसेनेच्या वाटेवरून परत आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असून छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर आज भाजप मंत्री रावसाहेब दानवे ( Ravsaheb Danve) यांनी राजू शिंदे यांची भेट घेतली. यावेळी भाजप सोडून जाऊ नये यासाठी राजू शिंदेंचे मतपरिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला गळती लागली आहे. माजी महापौर राजू शिंदेसह भाजपचे सात ते आठ पदाधिकारी ७ जूलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, भाजप नेत्यांकडून राजू शिंदे व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेशापासून थांबवण्याचे जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. कालपासून भाजप मंत्र्यांची या पदाधिकाऱ्यांना मनधरणी सुरु असून आज भाजप मंत्री अतुल सावे आणि आमदार हरीभाऊ बागडे यांनी राजू शिंदे यांच्यासोबत पक्षप्रवेशाच्या निर्णयापासून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजप नेते रावसाहेब दानवेंनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर राजू शिंदे यांच्याशी चर्चा केली.
विधानसभा निवडणूकांच्या आधी भाजपला गळती
लोकसभा निवडणूक (Loksabha Election) संपल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीच तयारी चालू केली आहे. विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल, यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. काही पक्षांनी तर वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी योग्य उमेदवारांचा शोधही चालू केला आहे. असे असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह ६ ते ८ पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच- राजू शिंदे
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे. येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे, असं आम्हाला वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती. पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपाने येथे मेहनतीने काम केलं होतं. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं. पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, असे राजू शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा: