एक्स्प्लोर
जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात महात्मा जोतिबा फुले यांची 125 वी पुण्यतिथी आणि शतकोत्तर रौप्य स्मृतीवर्षाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
छगन भुजबळांचं जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र
पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सध्या छगन भुजबळांचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात आहे. तिथूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहलं आहे. स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि थोर समाजसेवक जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात भुजबळांनी लिहिलं आहे की, "जोतिबा फुले यांचं निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालं. त्याला 125 पू्र्ण होत असल्याने राज्य सरकारने शतकोत्तर रौप्य स्मृती वर्ष पाळावा, अशी मागणी. अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने केली होती. पंरतु तुमच्या नेतृत्त्वाखालील सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन 28/11/2016 ते 28/11/2017 या काळासाठी कोणतंही नियोजन केलेलं नाही. अशाप्रकारचं दुर्लक्ष महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी विचारांचा अवमान करणारे आहेत."अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement