एक्स्प्लोर
Advertisement
छगन भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त, आयकर विभागाची धडक कारवाई
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरूंगाची हवा खाणाऱ्या छगन भुजबळांना आयकर विभागानं आणखी एक दणका दिला आहे. भुजबळ कुटुंबीयांची तब्बल 300 कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समजते आहे.
जवळपास 48 बनावट कंपन्यांच्या मदतीनं ही संपत्ती जमवण्यात आली होती. अशी धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी आयकर विभागानं नव्यानं छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटीसा बजावल्या आहेत. या कारवाईदरम्यान नाशिक आणि मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या संपत्तीवर टाच आणली आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भुजबळांच्या वकिलांकडून स्पष्टीकरण: याबाबत भुजबळांच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'नव्यानं कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मागील महिन्यात याबाबतची अंतरिम नोटीस आली होती आणि त्याला उत्तरही देण्यात आलं आहे. ईडीनं याआधी ज्या संपत्तीवर टाच आणली होती त्याच संपत्तीवर पुन्हा जप्ती आणली आहे. भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही नवी संपत्ती जप्त करण्यात आलेली नाही.' 14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळांना अटक पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती. ईडी तपास करत असलेलं प्रकरण मनी लाँडरिंग म्हणजे पैशाच्या अफरातफरीचं म्हणजेच ब्लॅकमनी व्हाईट करण्याचं आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे. संबंधित बातम्या:I-T dept slaps charges under Benami Transactions Act on NCP leader #ChaganBhujbal & family, attaches assets worth Rs 300 crore
— Press Trust of India (@PTI_News) July 5, 2017
छगन भुजबळ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार!
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा : छगन भुजबळ
भुजबळांची शेवटची संधी हुकली, हायकोर्टाने जामीन नाकारला
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
भुजबळांच्या ‘या’ व्हॉट्सअॅप डीपीवरुन चर्चांना उधाण!
पांढरीशुभ्र दाढी, पांढरे केस, भुजबळांचा नवा फोटो ‘माझा’कडे
जे.जे. हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी नको!: छगन भुजबळ
छगन भुजबळ हे विराट कोहली इतकेच फिट : दमानिया
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ 26 जणांना भेटले : ईडी
अटकेविरोधात छगन भुजबळांची हायकोर्टात याचिका दाखल
भुजबळांना जामीन मंजूर, मात्र जेलमधून सुटका नाही
भुजबळांच्या व्हायरल फोटोमागील सत्य उघड !
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार
छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या
भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement