एक्स्प्लोर

नागरिकांच्या जीवाशी खेळ, चिखलोली धरणाच्या नदीपात्रात केमिकलची पोती

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या नदीपात्रात अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात केमिकलची पोती टाकली. धक्कादायक म्हणजे पोती नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे हे उग्र आणि जीवघेणे केमिकल पावसाच्या पाण्यासोबत धरणात जाण्याची भीती असून तसं झाल्यास ते हजारो अंबरनाथकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. अंबरनाथच्या पूर्व भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे एक लाख नागरिकांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जलसंपदा विभागाच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलशुद्धीकरण करून नागरिकांना पाणी पुरवलं जातं. अंबरनाथ एमआयडीसीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरातून वाहत येणारा धबधबा हा या धरणाचा मुख्य जलस्त्रोत आहे. मात्र या धबधब्याच्या मार्गातच काही अज्ञातांनी जीवघेण्या केमिकलची पोती टाकली आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ, चिखलोली धरणाच्या नदीपात्रात केमिकलची पोती अजून पुरेसा पाऊस झालेला नसल्यानं धबधबा सुरू झालेला नाही. मात्र, त्यानंतर डोंगरावरून येणारं पाणी हे सारं केमिकल घेऊन धरणात जाईल, आणि अनर्थ होईल. या धबधब्याच्या मार्गात टाकलेल्या केमिकलच्या काही पोत्यांवर मेड इन मलेशियाचा, तर काही पोत्यांवर पैठण एमआयडीसीत असलेल्या क्रिस्टल कंपनीचा शिक्का आहे. त्यामुळं ते अंबरनाथ एमआयडीसीमधील एखाद्या रासायनिक कंपनीनं आयात केलं असावं आणि काम झाल्यावर त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट न लावता इथे टाकून दिलं असण्याची शक्यता आहे. मात्र यामुळं इथल्या स्थानिकांमध्ये धास्तीचं वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे या धरणाच्या नदीपात्रात हे केमिकल 15 ते 20 दिवसांपासून टाकलं जात असल्याचं सांगितलं जात असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, तसंच स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्ते सचिन गुडेकर यांचं म्हणणं आहे. मात्र अजूनही कुणीही हा धोका ओळखून कारवाईला गती दिलेली नाही. या सगळ्या प्रकाराबाबत ‘माझा’नं अंबरनाथ एमआयडीसीतील कंपन्यांची संघटना असलेल्या ‘आमा’चे (Additional Ambarnath Manufacturers Association) अध्यक्ष उमेश तायडे यांना गाठलं असता त्यांनाही याबाबत नीट काही सांगता आलं नाही. मात्र कुणी दोषी आढळलंच, तर कारवाई करू, असं तद्दन आश्वासन मात्र त्यांनी दिलं. अंबरनाथ एमआयडीसीमध्ये सध्या 87 रासायनिक कंपन्या असून त्यांच्यातून तयार होणारा कचरा तळोजा इथल्या रासायनिक डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्याचे निर्देश आहेत. मात्र तरीही काही कंपन्या अगदी थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात असले प्रकार करतात. मात्र त्याचे परिणाम किती गंभीर आहेत, हे त्यांना लक्षात येत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Annamalai : तमिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंनी स्वत:ला चाबकाचे फटके का मारले?Special Report Chhatrapati Sambhajinagar : कमांडो भरतीची बोगस जाहिरात, तरुणांची फसवणूकSpecial Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?Special Report : Suresh Dhas यांचे आरोप ,महायुतीमध्ये Dhananjay Munde एकाकी पडलेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget