एक्स्प्लोर
चंद्रपुरात गावगुंडाकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण
यानंतर आरोपी प्रभाकर नागपुरेने वादात उडी घेत, आपल्या पुतण्यासह पीडित महिलेच्या घरी धुडगूस घातला. या महिलेला फरफटत मुख्य चौकात आणलं आणि विवस्त्र करुन बेदम मारहाण केली.
![चंद्रपुरात गावगुंडाकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण Chandrapur : Woman stripped naked, beaten up by for goon चंद्रपुरात गावगुंडाकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/04142612/Chandrapur-Women-Beaten-up.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने एका गावगुंडाने शेजारी राहणाऱ्या महिलेला विवस्त्र करुन भर चौकात बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. मात्र श्रमिक एल्गार संघटनेने सत्य बाहेर आणल्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद करत आरोपींना अटक केली.
चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील येरगाव आठवड्यापूर्वी ही घटना घडली. सात दिवसांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीची पत्नी यांच्यात क्षुल्लक वाद झाला होता. यानंतर आरोपी प्रभाकर नागपुरेने वादात उडी घेत, आपल्या पुतण्यासह पीडित महिलेच्या घरी धुडगूस घातला. या महिलेला फरफटत मुख्य चौकात आणलं आणि विवस्त्र करुन बेदम मारहाण केली.
संपूर्ण गावाने ही घटना पाहिली, मात्र गावगुंडांसमोर गावकरी हतबल झाले. अखेर पोलिस पाटलांनी घटनेची माहिती मूल पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. मात्र अन्याय झालेल्या पीडितेने ही हकीकत श्रमिक एल्गार कार्यकर्त्यांना सांगितली. त्यांनी गाव गाठून सत्य जाणून घेतल्यावर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांना माहिती दिली.
त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपी आणि साथीदारांविरोधात गुन्हे करुन आरोपी प्रभाकर नागपुरेला अटक केली. अखेर सात दिवसांनी या पीडितेला न्याय मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)