एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकून करुन घेतला सर्पदंश, चंद्रपुरातील सर्पमित्राचा जीवघेणा प्रकार
धीरज घुमे याने स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करू नये म्हणून हा सर्व प्रकार गुप्त ठेवण्यात आला होता. पण ही गोष्ट आता समोर आल्यामुळे वनविभाग आणि पोलीस प्रशासनात चर्चा सुरु झाली आहे. मण्यार हा विषारी साप धीरजकडे कुठून आला आणि सर्पदंश करवून घेण्यामागे त्याचा काय उद्देश होता या बाबत अजून निश्चित माहिती समोर येऊ शकलेली नाही.
चंद्रपूर : व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकून एका सर्पमित्राने सर्पदंश करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मात्र वेळीच योग्य उपचार मिळाल्याने या सर्पमित्राचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. वरोरा शहरात राहणाऱ्या धीरज घुमे या सर्पमित्राने हा जीवघेणा प्रकार केला आहे. 24 ऑक्टोबर रोजी धीरज घुमे या सर्पमित्राने एक स्टेटस टाकले होते.
'उद्याचा दिवस आता देव ठरवणार आहे' आणि 'नागापेक्षा सहापट विषारी मण्यार सापाचा दंश स्वतःहून करून घेणार आहे मी' असे यात लिहिले होते. स्टेटस मध्ये टाकल्याप्रमाणे 25 ऑक्टोबरला त्याने मण्यार सापाकडून दंश करवून घेतला. सर्पदंशानंतर त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आणि 28 तारखेला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. धीरज घुमे याने स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करू नये म्हणून हा सर्व प्रकार गुप्त ठेवण्यात आला होता. पण ही गोष्ट आता समोर आल्यामुळे वनविभाग आणि पोलीस प्रशासनात चर्चा सुरु झाली आहे. मण्यार हा विषारी साप धीरजकडे कुठून आला आणि सर्पदंश करवून घेण्यामागे त्याचा काय उद्देश होता या बाबत अजून निश्चित माहिती समोर येऊ शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement