Devendra Fadanvis: मोदीजींच्या नेतृत्वात चंद्रयान उतरवलं, आता चंद्रपूरचे उमेदवार संसदेत उतरवा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान उतरवलं. आता चंद्रपूरचे उमेदवार थेट संसदेत उतरवा, अशा शब्दात चंद्रपुरकरांना आवाहन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना साद घातली आहे.
![Devendra Fadanvis: मोदीजींच्या नेतृत्वात चंद्रयान उतरवलं, आता चंद्रपूरचे उमेदवार संसदेत उतरवा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन Chandrapur Lok Sabha Election dcm Devendra Fadanvis appeal to Chandrapur voter for sudhir mungantiwar pm modi in chandrapur maharashtra marathi news Devendra Fadanvis: मोदीजींच्या नेतृत्वात चंद्रयान उतरवलं, आता चंद्रपूरचे उमेदवार संसदेत उतरवा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/0c41fb3773acf1b414bd707e08cfb4561712581156534892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election 2024 : मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरवलं. आता चंद्रपूरचं यान म्हणजेच चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नेतृत्वाच्या रूपाने आणि मोदीजींच्या आशीर्वादाने त्यांना थेट संसदेत उतरवा, अशा शब्दात चंद्रपुरकरांना आवाहन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मतदारांना साद घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Maharashtra) यांची आज महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात (Chandrapur) होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात (Modi in Chandrapur) दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे भाष्य केलंय.
आता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही
मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात चंद्रपूरमधून केलीय. त्यामुळे चांदा ते बांधापासून भाजप आणि महायुतीतील उमेदवारांना विजयापासून आता कोणीही रोखू शकत नाही, असा हुंकार पंतप्रधानांनी या ठिकाणी भरला आहे. चंद्रपूरच्या महाकालीला आज विजयासाठी आपण साऱ्यांनी साकड घातले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात हिंदूंमध्ये ज्याला शक्ती म्हटल्या जातं त्या शक्तीला मला संपवायचं आहे. मात्र, राहुल गांधींना कोणीतरी सांगितलं पाहिजे, महाकालीला संपवण्याचे तुमचे उद्दिष्ट हे केव्हाच पूर्ण होऊ शकत नाही. आकाशात जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत आमची शक्ती कुणीही संपू शकत नाही. कारण शक्ती म्हणजे आई आहे. आईच्याच पोटी आपण साऱ्यांनी जन्म घेतला आहे. त्यामुळे त्यांचे हा अजेंडा कधीही पूर्ण होऊ शकत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधीवर केली आहे.
चंद्रपूरचे उमेदवार संसदेत उतरवा - उपमुख्यमंत्री
आज राज्यात आणि चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री आणि आमदार म्हणून चंद्रपूरसह राज्यात पूर्णतः कायापालट केला आहे. तसेच अशोक नेते यांनी त्यांच्या नेतृत्वात येथील जनतेची सेवा केली आहे. ज्या चंद्रपूरचा विकास सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात झाला आहे, त्यांना आता दिल्लीच्या संसदेमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी देखील आपली असल्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केलाय.
चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज चंद्रपुरात होत आहे. त्यामुळे या सभेसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीससह चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)