एक्स्प्लोर

प्रतिभा धानोरकरांचा पत्ता कट? विजय वडेट्टीवारांच्या उमेदवारीवरुन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापलं

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा रंगत असताना प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक नाराज असल्याचे समोर आले आहे. 

Chandrapur Lok Sabha Election : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना लोकसभा उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा रंगतान दिसत आहे. दरम्यान, या चर्चेवरून दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांचे समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच  महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले आहे. 

आज दुपारी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयापुढे मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी दिली जावी, याचे उघडपणे समर्थन करत नारेबाजी केली आहे. या लोकसभा क्षेत्रातील जातीय समीकरणे बघता आणि काँग्रेस पक्षाची परंपरा लक्षात घेता धानोरकर यांनाच तिकीट दिले जावे, अन्यथा आम्ही वडेट्टीवार यांच्यासाठी काम करणार नाही, असा इशाराही धानोरकर समर्थकांनी दिला आहे. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापलं

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत 2014 आणि 2019 प्रमाणे नामुष्की ओढावून घ्यायची नाही, या इराद्याने मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांबाबत खल झाला. या बैठकीअंती महाराष्ट्रातील 13 उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.

प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीचं काय? 

एकीकडे विदर्भातील अनेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून अनेक नावांची चढाओढ लागली असतांना काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे. ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, ज्या उमेदवाराचा सर्वे अहवाल सकारात्मक आहे, त्यांच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देणे काँग्रेसने टाळल्याचे दिसतंय. एकीकडे चंद्रपूरमधून काँग्रेसच्या टिकीटावर आपणच उमेदवार असल्याचा दावा प्रतिभा धानोरकर यांनी वेळोवेळी केला आहे.

नुकतेच त्यांनी एक ट्विट करून उमेदवारी आपलीच आणि विजयही आपलाच असा दावा केला होता. प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर केलेल्या या ट्विटला महत्व प्राप्त झालं होते. मात्र आता राज्याच्या राजकारणाचे फिरते चक्र आणि अनेक तर्कवितर्क पाहता चंद्रपूरमधून काँग्रेसच्या टिकीटावर नेमकी कुणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget