एक्स्प्लोर
चंद्रपूर, परभणी, लातूर महापालिकांचं मतदान अवघ्या काही तासांवर
मुंबई : चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शुक्रवारी 21 तारखेला मतमोजणी होणार आहे.
एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. चंद्रपुरात 367, तर परभणीत 281 मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या 66 जागांसाठी 460 उमेदवार रिंगणात आहेत. परभणीत 65 जागांसाठी 418 उमेदवार आपलं नशीब आजमवत आहेत. उन्हाचा कडाका वाढला असल्यानं चंद्रपुरात मतदानाची वेळ एका तासानं वाढवण्यात आली आहे.
लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70
- राष्ट्रवादी काँग्रेस- 13
- काँग्रेस- 49
- शिवसेना- 06
- रिपाइं- 02
- राष्ट्रवादी काँग्रेस- 30
- काँग्रेस- 23
- शिवसेना- 8
- भाजप- 2
- अपक्ष- 2
- काँग्रेस- 26
- भाजप- 18
- शिवसेना- 5
- राष्ट्रवादी- 4
- मनसे- 1
- बीएसपी-1
- अपक्ष- 10
- भारिप बहुजन महासंघ- 1
संबंधित बातम्या :
लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिका निवडणुकीत 697 उमेदवार अल्पशिक्षित
राजकारण मला कळत नाही, मात्र काँग्रेस शिवाय पर्याय नाही : रितेश देशमुख
लातुरात काँग्रेसची गुंडगिरी, भाजप उमेदवाराच्या पतीवर उकळता चहा फेकून मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement