(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक नसतानाही मी पावसात भाषण केलं, चंद्रकांत पाटलांचा रोख नेमका कोणाकडं? सोलापुरात नेमकं काय घडलं?
सोलापुरात एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भर पावसात भाषण केलं. तसेच पावसातच पाटील यांनी काही लोकांचा सन्मान देखील केला. कुठलीही निवडणूक नसतानाही मी पावसात भाषण केल्याचे पाटील म्हणाले.
Chandrakant Patil : सोलापुरातील (Solapur) रामवाडी परिसरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थित महिलांच्या कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी अचानक वादळी वारा आणि पाऊस आल्यानं मांडवाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तुफान वादळी वाऱ्यामुळे मंडप उडून गेल्याची घटना घडली. मात्र, अशा वातावरणात देखील महिला बसूनच राहिल्याने मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील भर पावसात भाषण केलं. तसेच भर पावसातच चंद्रकांत पाटील यांनी काही लोकांचा सन्मान देखील केला. कुठलीही निवडणूक नसतानाही मी पावसात भाषण केल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान, वादळी वाऱ्यानं मंडप उडून गेला तरी कार्यक्रम सुरुच ठेवला. त्यामुळं चंद्रकांत पाटील हेदेखील व्यासपीठावर बसूनच होते. अचानक याठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले होते. यानंतर व्यासपीठावरील आणि समोर उभा केलेला मंडप उडून गेला. यानंतर पावसाला देखील सुरुवात झाली. अशा स्थितीतच चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. कुठलीही निवडणुका नसताना देखील मी पावसात भाषण केल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेमका पाटील यांचा रोख कोणाकडं असा सवालही उपस्थित केला जातोय.
चंद्रकांत पाटील यांचा रोख नेमका कोणाकडं?
सोलापुरातील रामवाडी परिसरात महिलांच्या कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात चंद्राकंत पाटील यांच्या हस्ते काही जणांचा सन्मान देखील करण्यात येणार होता. मात्र, अचानक परिसरातील वातावरण बदलले. वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळं मंडप उडून गेला. मात्र, अशा स्थितीत देखील समोर बसलेले सर्वजण जागेवर उठले नाहीत. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील भर पावसातच भाषण केलं. त्यांना पुढे आषाढी वारीच्या आढाव्यासाठी पंढरपूरला जायचे होते. अशा स्थितीत त्यांनी काही जणांचा भर पावसातच सन्मान देखील केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, जाता जाता पाटील यांनी कुठलीही निवडणुका नसताना देखील मी पावसात भाषण केल्याचे म्हटले. दरम्यान, चंद्राकांत पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे, कारण त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांचा प्रचार करताना शरद पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. यावेळी त्यांची भाषणाची जोरदार चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या:
विधीमंडळातील भेटीची A टू Z कहाणी! आधी चंद्रकांत पाटील, मग देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची भेट