एक्स्प्लोर

बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही, चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना उत्तर

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर : भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय, ते त्यांनी ठरवावं, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरला चर्चगेटला रेल्वेच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले. शिवाय, त्यांनी रेल्वेमंत्र्यांसह भाजपवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय.”, शिवाय, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. राज ठाकरे काय म्हणाले होते? मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरक्षित आणि सुखकर होत नाही तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारवर जोरदार निशाणा साधला. “इथे लोकांचं चालणं कठीण झालंय, तर बुलेट ट्रेन कशाला हवी? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी. जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला. मुंबईत चेंगराचेंगरी एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget