आज कसं असणार राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात हवामानाची (Weather) स्थिती नेमकी काय असेल? आज राज्यात पाऊस पडणार का? याबाबतची सविस्तर माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे.
Maharashtra Weather News : सध्या राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यात हवामानाची (Weather) स्थिती नेमकी काय असेल? आज राज्यात पाऊस पडणार का? याबाबतची सविस्तर माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे.
राज्यातील बहुंताश जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुंताश जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशानाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
'या' भागात कोसळणार जोरदार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तसेच उत्तर कोकण, आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाती शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह उपनगरांमध्येही आज पावसाची शक्यता आहे. आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश से. ते 28 अंश से. च्या आसपास राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
14 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतू, या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. हळूहळू मान्सून राज्याच्या विविध भागात सक्रिय होत आहे. या काळात राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊ, झाला आहे. नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सावधान! पुढील चार दिवस रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा, राज्यात कसं असेल हवामान?