एक्स्प्लोर
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
भिवंडी : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले असताना दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले.
जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दोन्ही हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मनोज म्हात्रेंच्या निकटवर्तीयांकडे संशयाची सुई फिरत आहे.
काही दिवसांपूर्वीही मनोज म्हात्रेंवर भिवंडीमधील नारपोली भागात हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणी कसून तपास करत असून मनोज म्हात्रेंचा कुणाशी वाद होता का? याचीही चौकशी सुरु आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement